DNA मराठी

क्राईम

Govinda Health Update: मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

Govind Helath Update: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा याच्या पायाला बंदुकीची गोळी असल्याची माहिती समोर आली आहे.  माहितीनुसार, स्वतःकडील बंदूक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दाबले गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि गोविंदा याच्या पायाला लागली.  यानंतर जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून तो आता सुखरूप असल्याची देखील माहिती समोर आली आहे.  तर दुसरीकडे याप्रकरणी जुहू पोलीसने पुढील तपास सुरू केला आहे.

Govinda Health Update: मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल Read More »

Crime News: धक्कादायक, जादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीची हत्या, 10 जणांना अटक

Crime News: झारखंडच्या सरायकेला-खरसावन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, या जिल्ह्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका जोडप्याच्या कथित हत्येप्रकरणी एका किशोरासह दहा जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. जिल्ह्यात दालभंगा चौकीच्या बिझर गावात 13 सप्टेंबरला ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कुचई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपींना अटक केली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून सोमा सिंग मुंडा (46) आणि त्यांची पत्नी सेजादी देवी (45) यांच्यावर गोळीबार केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, सोमा सिंग मुंडा जागीच मरण पावला, तर सेजादी देवी यांना बंदुकीत बिघाड झाल्यानंतर दडक्याने मारहाण करण्यात आली. 14 वर्षाच्या मुलाने शेजाऱ्याच्या घरी आसरा घेतला अधिकाऱ्याने सांगितले की, या जोडप्याचा 14 वर्षांचा मुलगा सानिका मुंडा पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने शेजारच्या घरी आश्रय घेतला. या घटनेमागील कारणांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Crime News: धक्कादायक, जादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीची हत्या, 10 जणांना अटक Read More »

Israel Attack On Lebanon : मोठी बातमी, इस्रायल लेबनॉनवर जमिनी हल्ला करणार, बिडेनने दिला इशारा

Israel Attack On Lebanon :  गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडून लेबनॉनवर हवाई हल्ले करण्यात येत आहे. तर बुधवारी या हल्ल्यांना प्रतिउत्तर म्हणून हिजबुल्लाकडून इस्रायलवर हवाई हल्ला करण्यात आला आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.इस्रायल लेबनॉनमध्ये जमिनीवर हल्ला करण्याची तयारी करत आहे.  इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी सैन्यांना लेबनॉनमध्ये हिजबुल्लासोबतच्या वाढत्या संघर्षाच्या दरम्यान जमिनीवर आक्रमणासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. इस्रायलचा हल्ला असाच सुरू राहिल्यास हिजबुल्लाला पूर्ण पाठिंबा देऊ, असे इराणने म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लेबनॉनमध्ये जर जमिनीवर हल्ला केला तर ते ‘ऑल आऊट वॉर’ असेल, असे म्हटले आहे. बुधवारी इस्त्रायली हल्ल्यात किमान 72 लोक ठार आणि 233 जखमी झाल्याची माहिती लेबनीज आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. “तुम्ही ओव्हरहेड जेट्सचा आवाज ऐकत आहात. आम्ही दिवसभर हल्ला करत आहोत. हे तुमच्या संभाव्य प्रवेशासाठी आणि हिजबुल्लाला कमकुवत करण्यासाठी मैदान तयार करण्यासाठी आहे,” इस्रायली सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्झी हॅलेवी यांनी इस्रायली सैन्याला सांगितले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले – लेबनॉनमध्ये युद्ध होऊ नये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यूएन जनरल असेंब्लीला सांगितले की, “लेबनॉनमध्ये युद्ध होऊ नये. आम्ही इस्रायलला लेबनॉनमधील हल्ले थांबवण्याची आणि हिजबुल्लाला इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले थांबवण्याची विनंती करतो.” इस्त्रायलने हिजबुल्लाहविरोधात सोमवारी सुरू केलेल्या मोहिमेपासून लेबनॉनमध्ये 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. UN च्या आकडेवारीनुसार लेबनॉनमध्ये सुमारे 90,000 लोक विस्थापित झाले आहेत. हे 110,000 लोकांव्यतिरिक्त आहेत ज्यांनी तणाव वाढण्यापूर्वी घरे सोडून पळ काढला.

Israel Attack On Lebanon : मोठी बातमी, इस्रायल लेबनॉनवर जमिनी हल्ला करणार, बिडेनने दिला इशारा Read More »

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Akshay Shinde Encounter Case :  पोलीस एन्काऊंटरमध्ये बदलापूर घटनेचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. तर आता त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आली आहे.  रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागल्याचे आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूचे मुख्य कारण जास्त रक्तस्त्राव झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.   रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक   अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. मंगळवारी अक्षय शिंदेचे पोस्टमॉर्टम झाला, जे सुमारे सात तास चालले आणि त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली, असे डॉक्टरांनी सांगितले.  5 डॉक्टरांच्या समितीने अक्षय शिंदेचे शवविच्छेदन केले. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह अद्याप ताब्यात घेण्यात आलेला नाही. अक्षय शिंदे यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात येणार आहे. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबाबत महाराष्ट्र सरकारच्या विधानात विसंगती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ते म्हणाल्या की, ज्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला आणि हातात हातकड्या असलेला आरोपी चालत्या वाहनात पोलीस कर्मचाऱ्याकडून पिस्तुल कसा हिसकावू शकतो. बारामतीत पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, खटला संपल्यानंतर आरोपींना जाहीर फाशी द्यावी, जेणेकरून समाजात मजबूत संदेश जाईल, अशी मी मागणी केली होती.  दुसरीकडे, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर कोणालाही सोडणार नसल्याचे सांगितले होते, असा दावा एका पोलिस अधिकाऱ्याने केला. आरोपीवर गोळीबार करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे म्हणाले की, अक्षयच्या वागण्यावरून तो सगळ्यांना मारेल असे वाटत होते, त्यामुळे त्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा Read More »

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही…

Akshay Shinde :  बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालाय. हा एन्काउंटर कसा झाला याचा माहिती आता समोर येत आहे.  सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेते होते. त्याचे पत्नीने केलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणात हे रिमांड होते. याप्रकरणात चौकशीसाठी नेण्यात येत होते. तळोजा जेलमधून त्याला बदलापूरकडे नेण्यात येत होते. साधारण साडेसहाच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. त्यानंतर निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरनी शिंद याला मृत घोषित केलंय. तर जखमी एपीआय निलेश मोरेंवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, थेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरणावरून राजकारण तापणार हे नक्की.

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही… Read More »

Who is Ryan Wesley Routh : कोण आहे रायन रुथ? ज्याने Donald Trump ला मारण्याचा प्रयत्न केला

Who is Ryan Wesley Routh : अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.   या प्रकरणी बंदूकधारी 58 वर्षीय रायन वेस्ली रुथ याला अटक करण्यात आली आहे. ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी तो एके-47 रायफल घेऊन फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथे आला होता. ट्रम्पवर हल्ला करण्याआधी, रुथ यांनी सोशल मीडियावर सांगितले की, यावर्षी “लोकशाहीवर मतदान केले जात आहे. आम्ही हरवू शकत नाही.” ते लोकशाही समर्थक आहेत. यापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी युक्रेनचा समर्थक असल्याचा दावा केला होता. रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात लढण्यासाठी ते कीव येथे गेल्याचे सांगण्यात आले. वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्समध्ये ट्रम्प गोल्फ खेळत होते. यावेळी राऊत त्यांच्या जवळपास 400 मीटर जवळ पोहोचले. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सच्या लक्षात आले आणि त्यांनी गोळीबार केला. यानंतर रौथने एके 47 रायफल आणि दोन बॅग फेकून कारमध्ये पळ काढला. नंतर त्याला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून एक AK-47 रायफल, एक स्कोप, दोन बॅग आणि एक GoPro डिव्हाइस जप्त केले. रायन वेस्ली रुथचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे रायन वेस्ली राउथ हा नॉर्थ कॅरोलिनाचा आहे. त्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. 2019 पासून युक्रेनला अमेरिकेच्या मदतीला त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला आहे. तो डेमोक्रॅटिक उमेदवारांना पाठिंबा देतो. रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनमध्ये पोहचला  एका मुलाखतीत रुथने दावा केला होता की, रशियासोबतच्या युद्धाच्या सुरुवातीला तो युक्रेनच्या बाजूने लढायला गेला होता. त्याने कीवमध्ये पोहोचल्यानंतर लढ्यात सामील होण्यासाठी लोकांना भरती करण्यास मदत केली. तिने नॉर्थ कॅरोलिना कृषी आणि तांत्रिक राज्य विद्यापीठात शिक्षण घेतले. 2018 च्या सुमारास तो हवाईला गेला.

Who is Ryan Wesley Routh : कोण आहे रायन रुथ? ज्याने Donald Trump ला मारण्याचा प्रयत्न केला Read More »

Cyber Fraud : महिलेशी इंस्टाग्रामवर मैत्री अन् त्यानंतर घडलं असं काही…

Cyber Fraud: गेल्या काही दिवसांपासून देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. दररोज कुणाची न कुणाची फसवणूक होत आहे. त्यामुळे आता सायबर सुरक्षेची मागणी  नागरिकांमधून करण्यात येत आहे.    गुरुग्राममध्ये एका महिलेची इंस्टाग्रामवर केलेल्या मित्राने फसवणूक केली. या नराधमाने महिलेची 1.43 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. परदेशातून पाठवलेली भेटवस्तू प्राप्त करण्यासाठी कस्टम ड्युटी शुल्क भरण्यासाठी महिलेला आवश्यक पेमेंट करण्यास सांगितले होते.  या महिलेने हे शुल्क भरले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले मात्र गिफ्ट मिळाली नाही. याप्रकरणी महिलेने सायबरकडे तक्रार केली आहे. हिंदी शिकण्याच्या बहाण्याने मैत्री या महिलेची इंस्टाग्रामवर कॅलेस एरिक नावाच्या तरुणाशी मैत्री झाली. त्याने सांगितले की तो युरोपमध्ये राहतो. त्याला भारत आवडतो आणि त्याला हिंदी शिकायची इच्छा आहे. ती त्याला हिंदी शिकवेल का? महिला हो म्हणाली. यानंतर महिलेला फोन आला पण फोनवर तिची भाषा समजू शकली नाही. त्यानंतर महिलेला एक मेसेज आला ज्यामध्ये लिहिले होते की कॅलिस एरिक नावाच्या व्यक्तीकडून एक पॅकेट येईल ज्यासाठी तिला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम ड्युटी शुल्क भरावे लागेल. यानंतर ही महिला त्या दुष्ट व्यक्तीच्या जाळ्यात अडकली. कस्टम क्लिअरन्ससाठी पहिले 50 हजार घेतले… पॅकेज तयार असल्याचेही महिलेला सांगण्यात आले. सीमाशुल्क विभागाला 50 हजार रुपये क्लिअरन्स शुल्क भरावे लागणार आहे. नकार दिल्यावर ते परत करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. या पेमेंटनंतर त्याच्याकडून विमा आणि आयकराच्या नावावर आणखी 96 हजार रुपये वसूल करण्यात आले. एवढेच नाही तर दोन वेळा पैसे जमा केल्यानंतर महिलेला पुन्हा 1.70 लाख रुपये अतिरिक्त शुल्क भरण्यास सांगण्यात आले. यावरून महिलेने पोलिसांत गुन्हा दाखल केला. सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. फसवणूक कॉल येतो तेव्हा सावध रहा तुमच्या फोनवर कधीही फसवणूक कॉल येऊ शकतात, त्यामुळे नेहमी सतर्क रहा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बक्षीस जिंकण्याचा मोह देखील होऊ शकतो. तुम्हाला कधी असा कॉल आला तर कोणतीही गोपनीय माहिती देऊ नका. तुमचा डेबिट कार्ड पिन क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक किंवा आधार क्रमांक देऊ नका. जर कोणी नोंदणीसाठी फोनवर OTP मागितला तर तो अजिबात देऊ नका. सायबर गुन्हेगारही याद्वारे फसवणूक करू शकतात. कॉलवर जास्त वेळ राहू नका.

Cyber Fraud : महिलेशी इंस्टाग्रामवर मैत्री अन् त्यानंतर घडलं असं काही… Read More »

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू

Israel Strikes : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या इस्रायल आणि हमास युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झालाय. यातच आता पुन्हा एकदा इस्लायने गाझापट्टीवर मोठा हल्ला केला आहे.   माहितीनुसार इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 जण जखमी झाले आहेत. गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने ही माहिती दिली.  मंगळवारी इस्रायलने पॅलेस्टाईनच्या दक्षिणेकडील भूभागावर हल्ला केला. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की त्यांनी या भागातील हमास कमांड सेंटरला टार्गेट केले आहे. गाझामधील खान युनिस शहरातील अल-मवासी भागात इस्रायली लष्कराने हा हल्ला केला. हा असा भाग आहे की इस्त्रायली सैन्याने युद्ध सुरू झाल्यावर सुरक्षित क्षेत्र घोषित केले होते. हजारो पॅलेस्टिनींनी येथे आश्रय घेतला आहे. स्थानिक आणि डॉक्टरांनी सांगितले की, खान युनिस जवळील अल-मवासी येथील तंबूच्या छावणीला चार क्षेपणास्त्रांनी मारले. हा छावणी विस्थापित पॅलेस्टिनींनी भरलेला आहे. गाझा सिव्हिल इमर्जन्सी सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, 20 तंबूंना आग लागली. इस्रायली क्षेपणास्त्रांनी 30 फूट खोल खड्डे तयार केले आहेत. 60 जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. 40900 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे खान युनिसमधील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ला केल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हमासने इस्रायलचे आरोप फेटाळले आहेत. हे खोटे असल्याचे हमासने एका निवेदनात म्हटले आहे.   7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर मोठा हल्ला केला. यामध्ये 1200 इस्रायली मारले गेले आणि 250 लोकांना ओलिस बनवण्यात आले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 40,900 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू Read More »

Ahmednagar Crime : अभिजीत सांबरेची हत्याच! 14 महिन्यानंतर धक्कादायक खुलासा

Ahmednagar Crime : 14 महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अभिजीत राजेंद्र सांबरे (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) यांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र त्यांच्या मृत्यु संशयास्पद झाला असल्याचा दावा नातेवाईकांकडून करण्यात येत होता.   सदर संशयास्प्द मुत्यू त्याचे सोबत असणारा मित्र प्रमोद जालींदर रणमाळे याने घडवुन आणला असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येत होता.   या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हेशाखा, युनिट क. 2 कडिल पोहवा/मनोहर शिंदे यांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने  आरोपी प्रमोद जालींदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, यांनी शिताफिने ताब्यात घेतले.  आरोपीची वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे यांनी तपास कौशल्य, अ.मू.चे पेपर अवलोकन, तांत्रीक विश्लेषण वापरून विचारपुस केली असता आर्थिक व्यवहारातून हत्या केल्याची कबुली दिली.  मयत अभिजीत सांबरे हा आरोपीचा मित्र होता. त्यांचे यापुर्वीपासुन पैश्यांचे व्यवहार होते व त्यातुन त्यांचा वाद विकोपास गेला होता. त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे याने मयत इसम अभिजीत सांबरे यास मारण्याबाबत डाव आखलेला होता.  27 जुन 2023 रोजी आर्थीक व्यवहाराकरीता यातील मयत हा येवला जि, नाशिक येथे जाणार होता. त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते. संशयित प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजीत सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेवुन रात्री 9.00 वाचे सुमारास त्यास दारूमधुन ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरीक्त मात्रेमध्ये गोळया मिसळुन त्यास दारू पाजली. त्यातुन मयत अभिजीत सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असतांना त्यास त्याचे बुलेट गाडीवर मागे बसुन येवला येथुन संभाजीनगर कडे जाणा-या रस्त्याने वैजापुर गावाजवळुन कोपरगाव रस्त्याने घेवुन गेला.  मयत इसम अभिजीत सांबरे याची शुध्द हरपल्याचा अंदाज घेवुन गाडी थांबवुन त्यास कोपरगाव रस्त्याचे कडेला फेकुन देवुन पोबारा केला होता.  या प्रकरणात कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे भादंविक 302 प्रमाणे दाखल झाला असुन त्यास पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे.

Ahmednagar Crime : अभिजीत सांबरेची हत्याच! 14 महिन्यानंतर धक्कादायक खुलासा Read More »

Delhi Police: 11 वर्षीय विद्यार्थिनीचा सेल्फ डिफेन्स इन्स्ट्रक्टरने लैंगिक छळ केला, गुन्हा दाखल

Delhi Police:  दिल्लीतील सुलतानपुरी भागात असलेल्या एका सरकारी शाळेत, सेल्फ डिफेन्स इन्स्ट्रक्टरने एका 11 वर्षीय विद्यार्थिनीचा कथित लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. ज्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.   पोलिसांनी सांगितले की, आरोपी सतीश (45) याला अटक करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की ते एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) माध्यमातून मोफत सेल्फ डिफेन्सचे वर्ग घेत असत. ते शाळेत नियमित शिक्षक नाही.  दिल्ली सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण मंत्री आतिशी यांनी या प्रकरणाची त्वरित सर्वसमावेशक आणि तपशीलवार चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात म्हटले आहे की, निष्कर्षांच्या आधारे, सर्वात कठोर आणि निर्णायक कारवाई केली जाईल. सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकार दृढ वचनबद्ध आहे. शिक्षकावर कारवाईची मागणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कुटुंबातील सदस्य आणि शेजारी पोलिस स्टेशनच्या बाहेर जमले आणि शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.  पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीने त्यांना दुपारी फोन केला आणि माहिती दिली की तिच्या क्रीडा शिक्षकाने तिला वर्गात अयोग्यरित्या स्पर्श केला आणि तिला धमकावले. कलम 351 अन्वये गुन्हा दाखल पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला आणि स्थानिक पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी 12.12 वाजता घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 351 (गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यानुसार सुलतानपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Delhi Police: 11 वर्षीय विद्यार्थिनीचा सेल्फ डिफेन्स इन्स्ट्रक्टरने लैंगिक छळ केला, गुन्हा दाखल Read More »