DNA मराठी

क्राईम

एसआयटीची स्थापना करा नाहीतर आंदोलन करणार…, पारनेर तालुक्यात ‘त्या’ प्रकरणात शेतकरी आक्रमक

Parner News : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात सहा दिवसांपूर्वी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, या कारखान्यात 17 सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण संबंधित असून या घोटाळ्याची व्याप्ती 249 ते 300 कोटी पेक्षा जास्त असल्याची सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी होत आहे. मात्र सरकारने आतापर्यंत या प्रकरणात एसआयटी स्थापन न केल्याने पारनेर पोलीस स्टेशन समोर साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणात मिळाली माहिती अशी की, या कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्ज असल्याचे दाखवले आणि विक्रीची बेकायदा प्रक्रिया करण्यात आली. तसेच फक्त पाचशे रुपये मुद्रांक शुल्क कारखान्याचा विक्रीसाठी देण्यात आले. त्यामुळे या व्यवहारात सरकारचा दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला असा देखील आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ज्यादिवशी कारखान्याची विक्री केली त्याच दिवशी क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत घेण्याकरिता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेऊन कर्ज पुरवठा केला. त्यामुळे पारनेर साखर कारखान्याची मालमत्ता फक्त 32 कोटी रुपयांना खरेदी करून त्यावर 249 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले. त्यामुळे कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने 17 हजार सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल करून या प्रकरणात एसआयटीची मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलीस ठाण्यात क्रांती शुगर अ‍ॅण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या खासगी साखर कारखान्याचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले व निवृत्ती नवले या 9 संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन जनरल मॅनेजर अनंत भुईभार व वरिष्ठ अधिकारी अनिल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एसआयटीची स्थापना करा नाहीतर आंदोलन करणार…, पारनेर तालुक्यात ‘त्या’ प्रकरणात शेतकरी आक्रमक Read More »

Pune Crime: प्रॉपर्टी हडप करण्याचा संशय अन् पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा केला खून

Pune Crime: घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. फोन केल्यानंतर या पतीने या खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडिया वरती व्हायरल केला आहे. ज्योती शिवदास गीते असे या खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. चंदन नगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते याला अटक केली आहे. ही घटना त्याच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणार आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो. खराडी परिसरात तो भाड्याने राहत आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण होत होती. शिवदास यांनी घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला आहे. माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल असा त्याला संशय होता. या संशयात त्याने ज्योतीचा खून केला. पुढील तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत. ज्योती गीतेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे देण्यात आला असून तो तिच्या मूळ गावी पाठवण्यात आला आहे.

Pune Crime: प्रॉपर्टी हडप करण्याचा संशय अन् पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा केला खून Read More »

Jalgaon Train Accident मृतांचा आकडा 13 वर पोहोचला, रेल्वेकडून आर्थिक मदत जाहीर

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालयाने जळगाव रेल्वे अपघातातील प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1.5 लाख रुपये, गंभीर जखमींना 50,000 रुपये आणि किरकोळ जखमींना 5000 रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे, असे रेल्वेमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले. 22 जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यात कर्नाटक एक्सप्रेसने धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यूएएनआयशी बोलताना जळगावचे एसपी महेश्वर रेड्डी म्हणाले, जळगाव रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेल्वेने अहवाल सादर केल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू. बुधवारी 22 जानेवारी रोजी पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी आगीच्या भीतीने त्यांच्या डब्यातून बाहेर पडले आणि रुळांवर उभे राहिले तेव्हा ही घटना घडली. दरम्यान, कर्नाटक एक्सप्रेस ट्रॅकवरून गेली, ज्यामुळे अनेक प्रवासी चालत्या ट्रेनने धडकले आणि 13 जणांचा मृत्यू झाला. पुढील तपास सुरू आहे. पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला शोकतत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जळगाव येथे झालेल्या दुःखद रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान म्हणाले, महाराष्ट्रातील जळगाव येथील रेल्वे ट्रॅकवर झालेल्या दुःखद अपघाताने मला दुःख झाले आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि सर्व जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. अधिकारी बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींच्या सर्व वैद्यकीय खर्चाचा खर्चही राज्य सरकार उचलेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देईल आणि जखमींचा संपूर्ण खर्चही राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.

Jalgaon Train Accident मृतांचा आकडा 13 वर पोहोचला, रेल्वेकडून आर्थिक मदत जाहीर Read More »

Fake Money : बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पुणे पोलिसांनी मोठी कारवाई

Fake Money: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. नीलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलिस ठाण्यातील तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. पद्मावती बस स्थानकाजवळ पोलिसांना पाहून एकजण स्वारगेटच्या दिशेने पळू लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून अडवले आणि त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या खिशातून पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल मिळाले. रात्री अंधारात तो बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्न करीत होता. त्याला शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा यांनी या नोटा दिल्याचे सांगितले. पोलिसांनी वीरकरला नवी मुंबई येथे नेत तिथून शाहीदला अटक केली. चौकशीत अन्सारीने त्याला बनावट नोटा दिल्याची माहिती दिली. सहकारनगर पोलिसांनी एक-एक साखळी जोडत पाच जणांना अटक केली त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रुपयांच्या पाचशेच्या दोन हजार नोटा जप्त केल्या. या सर्व बनावट नोटा दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आणल्याचे सांगितले. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Fake Money : बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पुणे पोलिसांनी मोठी कारवाई Read More »

UP Crime: मामी आणि भाचाचं प्रेम… नंतर मामाचा काढला कटा

UP Crime: मामी आणि भाच्यामधील नात्यात एक लज्जास्पद घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिरोजाबादमध्ये, एका भाच्याने त्याच्या मामाची हत्या केली कारण तो त्याच्या मामीच्या प्रेमात आंधळा झाला होता. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना खैरगड पोलीस ठाण्यातील वैरनी गावातील आहे, जिथे सत्येंद्र नावाच्या तरुणाचे 8 मे 2021 रोजी रोशनी नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. सत्येंद्र आणि रोशनी यांच्या वयात खूप फरक होता, सत्येंद्र त्याच्या पत्नीपेक्षा सुमारे 22 वर्षांनी मोठा होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली, पण काही काळानंतर रोशनीला तिच्या पतीचा भाचा गोविंदवर प्रेम झाले. गोविंद आणि रोशनीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, जे सत्येंद्रच्या लक्षात आले. त्यामुळे घरात वारंवार वाद होऊ लागले. हे प्रकरण इतके वाढले की रोशनी आणि गोविंद यांनी मिळून सत्येंद्रच्या हत्येचा कट रचला. हे षड्यंत्र गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते आणि 14 जानेवारीच्या रात्री ते अंमलात आणण्यात आले. 14 जानेवारी रोजी संध्याकाळी गोविंद त्याचे मामा सत्येंद्र यांच्या घरी आला आणि जेवण करून सर्वजण झोपायला गेले. रात्रीच्या अंधारात गोविंदने त्याचे मामा सत्येंद्र यांची हत्या केली आणि तो पळून गेला. सकाळी सत्येंद्रचा मृतदेह सापडला तेव्हा गावात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, मृत सत्येंद्रचा भाऊ शत्रुघ्नने हत्येचा अहवाल दाखल केला होता ज्यामध्ये पत्नी रोशनी आणि भाचा गोविंद दोघांनाही आरोपी ठरवण्यात आले होते. एसपी (ग्रामीण) अखिलेश भदोरिया यांनी माहिती दिली की, “चौकशीदरम्यान गोविंदने सांगितले की त्याचे त्याच्या मामीसोबात प्रेमसंबंध होते आणि म्हणूनच त्याने त्याच्या मामाची हत्या केली.” पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

UP Crime: मामी आणि भाचाचं प्रेम… नंतर मामाचा काढला कटा Read More »

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप

Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर आता या प्रकरणात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव करण्यात येत आहे असा आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडने केला आहे. माध्यमांशी बोलताना माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच आम्हाला मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका निवडणुकीत माझ्या नवऱ्याने तुमचे काम केले आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देता आहे. असं देखील त्या म्हणाल्या. माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाल्या की मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत आहेत. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की हे थांबवा. घटना घडली त्यादिवशी माझे पती परळीत किंवा जिल्ह्यात नव्हते. वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाले म्हणून डोळ्यात खुपू लागले. बजरंग सोनवणे यांनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप Read More »

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांची कारवाई, चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास लावला, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई करत श्रीगोंदा न्यायालय आणि परीसरातुन चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास करत तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करून दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 4 जानेवारी रोजी श्रीगोंदा पो स्टे हद्दीतील काष्टी गावामध्ये एक इसम संशयीत रित्या विना नंबर प्लेटच्या मोटर सायकलवर फिरत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती मिळाली. या माहितीवरून किरण शिंदे यांनी पेट्रोलिंग करीता काष्टी गावात एक पथक रवाना केले. पेट्रोलिंग दरम्यान श्रीगोंदा चौक, काष्टी येथे एक इसम श्रीगोंदा चौकात मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी संशयीतरीत्या मोटार सायकलवर फिरत असताना मिळून आला. त्यास पोलिसांनी नाव-गांव विचारले असता महेंद्र बाळु सुपेकर (रा. पुनर्वसन काष्टी ता.श्रीगोंदा) येथे राहत असल्याचे सांगीतले तसेच अधिक चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणले. चौकशी दरम्यान पैशांची आवश्यकता असल्याने मी कोर्टाचे पाकींग, श्रीगोंदा शहर, काष्टी गावात व इतर वेगवेगळया ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपींकडून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांची कारवाई, चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास लावला, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

Maharashtra News: जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार

Maharashtra News: तालुक्यात अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीत आदेशातील रक्कम शासन जमा न केल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, अहिल्यानगर जवळील गंगा उद्यानाच्या मागील बाजूस जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्तेची किंमत, अनामत रक्कम, तसेच लिलावाच्या अटी व शर्तीकरिता तहसीलदार अहिल्यानगर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अशी माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली आहे.

Maharashtra News: जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार Read More »

Maharashtra News: नगर शहरात बिबट्याची दहशत, बोल्हेगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

Maharashtra News: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याकडून नागरिकांवर हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहे. तर आता पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार नगर शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील बोल्हेगाव या भागात बिबट्याने एका युवकावर प्राण घातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना गुरुवार दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला आहे. बोल्हेगावला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाजवळ हि घटना घडली आहे.या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे.तसेच या नदीजवळ बाहेर राज्यातील लोक मोठ्या कामाला आलेले आहेत तिथे त्यांची लोकवस्ती आहे.बिबट्याने अक्षय चंद्रशेखर गुंजाळ या युवकार प्राणघातक हल्ला केला त्याच्या पायाला बिबट्याने चावा घेतला आहे. दरम्यान भर वस्ती व वर्दळीचे ठिकाण असलेल्या भागामध्ये बिबट्यांकडून हल्ला झाल्याच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर शहरात तसेच बोल्हेगाव परिसरातील लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. जखमी अक्षय गुंजाळ याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra News: नगर शहरात बिबट्याची दहशत, बोल्हेगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला Read More »

Pune Road Accident: पुण्यात भीषण अपघात, डंपरने लोकांना चिरडले, 3 ठार, 6 जखमी

Pune Road Accident: पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. माहितीनुसार, मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मद्यधुंद कारचालकाने 9 जणांना चिरडलेघटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वाघोली, पुणे येथील केसनंद फाट्याजवळ हा अपघात झाला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या लोकांवर वाहन चालवल्याने हा अपघात झाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे सर्व लोक मजूर असून अमरावतीहून पुण्यात कामानिमित्त आले होते. अपघातादरम्यान फूटपाथवर एकूण 12 जण झोपले होते. त्यानंतर एका डंपरचे नियंत्रण सुटले आणि झोपलेल्या कामगारांना पायदळी तुडवत थेट फूटपाथवर गेला. चालकाला अटकपोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्यामुळेच हा अपघात झाला. पोलिसांनी आरोपी चालकावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

Pune Road Accident: पुण्यात भीषण अपघात, डंपरने लोकांना चिरडले, 3 ठार, 6 जखमी Read More »