DNA मराठी

Zika Virus

Zika Virus : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा सरसावली…, नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

Zika Virus: झिका, डेंग्यू यासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवून डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसहभाग तसेच महापालिका प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नांतून विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येईल असे प्रतिपादन महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी केले. झिका, डेंग्यू आदी विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी एक तास स्वच्छतेचा हा उपक्रम दर रविवारी राबवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार महापालिकेच्यावतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी डॉ. बोरगे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. एडिस डासामुळे विषाणूजन्य आजार पसरतात. एडीस डास हा आपल्या परिसरात स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने आपल्या जवळपास कोणत्याही प्रकारचे पाणी साचू देऊ नये. फ्रीजचे ट्रे, कुंड्या, पक्षांना पिण्यासाठी ठेवलेले पाण्याचे भांडे, जुने टायर भंगार वस्तू इत्यादी ठिकाणी साचणारे पाणी वाहते करून ही डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट केल्यास विषाणूजन्य आजारांना रोखता येईल. त्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा असल्याचे यावेळी डॉ बोरगे यांनी सांगितले.  महापालिका आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या या जनजागृती कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या परिसरातील डास उत्पत्ती निर्माण करणारी स्थाने नष्ट केली. आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनानुसार अहमदनगर शहरातील सर्व भागांमध्ये नागरिक स्वयंप्रेरणेने डेंग्यू विरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन त्यासाठी आवश्यक असलेल्या उपायोजना करीत आहेत. त्यामुळे विषाणूजन्य आजारांवर आपण सर्व निश्चितच नियंत्रण मिळवू असा विश्वास डॉ. अनिल बोरगे यांनी यावेळी व्यक्त केला.  नगर शहरात डेंग्यू मुक्त अभियानात आठवड्यातुन दर रविवारी एक तास नागरिकांना सहभागी करून कुंड्या,कूलर,जुन्या निरोपयोगी वस्तू ,टायर यामध्ये साचलेले पाणी रिकामे करण्यात यावी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तसेच ताप- डोके- डोळे- सांधे दुखणे, मांसपेशी दुखणे तापा सोबत,अंगावर लालसर पुरळ येणे,उलट्या होणे पोट दुखणे उलटी लक्षण आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन सल्ला घ्यावा तसेच डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया हे आजार डासां मार्फत होतात त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये डेंग्यू आजारावर योग्य वेळेत औषध उपचार केल्यास रुग्ण खात्रीने बरा होतो डेंगू आजाराच्या निदानासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे मोफत रक्ताची एलायझा चाचणी करून घ्यावी तपासाची लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिली.

Zika Virus : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा सरसावली…, नागरिकांना केले महत्वाचे आवाहन Read More »

Zika Virus: सावधान, ‘या’ शहरात वाढत आहे झिकाचा धोका, समोर आले 15 रुग्ण

Zika Virus:  राज्यात हळूहळू झिका वाढताना दिसत आहे. माहितीनुसार, पुण्यात आतापर्यंत झिकाचे 15 रुग्ण आढळून आले आहे.  त्यामध्ये 9 गर्भवती महिलांचाही समावेश आहे. तीन नवीन रुग्ण आढळल्याने मंगळवारी पुण्यातील झिका रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली. तिन्ही बाधित महिला गर्भवती असून त्या जिल्ह्यातील पाषाण परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय 23 आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा अहवाल 5 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. तर 8 जुलै रोजी 18 वर्षांच्या 28 आठवड्यांच्या गर्भवती महिलेमध्ये संसर्गाची पुष्टी झाली. तिसरा केस, 23 आठवड्यांची गरोदर असलेल्या 19 वर्षीय महिलेची 8 जुलै रोजी चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना सांधेदुखी आणि सौम्य ताप होता. 20 जूनपासून, पुणे महानगरपालिकेने (PMC) झिका विषाणूची 15 प्रकरणे नोंदवली आहेत, ज्यात नऊ गर्भवती महिलांचा समावेश आहे. जर गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली असेल तर त्यांच्या नवजात बालकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या समस्या, ऐकण्याची क्षमता कमी होणे अशा अनेक समस्या नवजात बालकांमध्ये उद्भवू शकतात. मेंदूच्या असामान्य विकासामुळे अनेक प्रकरणांमध्ये बाळाचे डोके खूपच लहान असते. देशात झिकाची अद्याप कोणतीही लस नाही. झिका   प्रामुख्याने संक्रमित एडिस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा संसर्ग गंभीर नसला तरी गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास तो गर्भासाठी धोकादायक ठरू शकतो. झिका  लैंगिक संभोगातूनही पसरू शकतो. याशिवाय, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, झिका संक्रमित रक्ताच्या संक्रमणाने देखील पसरतो.

Zika Virus: सावधान, ‘या’ शहरात वाढत आहे झिकाचा धोका, समोर आले 15 रुग्ण Read More »