DNA मराठी

Walmik Karad Update

Walmik Karad : वाल्मिक कराडला मोठा धक्का! करोडो रुपयांची संपत्ती एसआयटी करणार जप्त

Walmik Karad : वाल्मिक कराड याच्यावर आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होत आहे आणि यातूनच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचेही बोलले जात आहे. पण सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत पुन्हा एकदा भर पडली आहे. याला कारण आहे त्याची संपत्ती. मागील काही दिवसांपासून वाल्मिक कराड, त्याची पत्नी आणि मुलांच्या नावावर राज्यात विविध ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती. साधा घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराड कडे इतकी संपत्ती कुठून आणि कशी आली? याचे कोडे अजूनही उलगडले नाही. पण आता वाल्मिक कराडची ही सर्व संपत्ती एसआयटीने जप्त करण्याची तयारी सुरु केली असून त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज देखील दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा देखील संकलित केला आहे. त्याचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे बोलले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी खूप मोठा धक्का ठरु शकतो. याआधी सीआयडीने कराडची संपत्ती परदेशात असल्याचा संशय व्यक्त केला होता. अशातच आता एसआयटीने कराडच्या संपत्तीची पाळेमुळे खणायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळते.

Walmik Karad : वाल्मिक कराडला मोठा धक्का! करोडो रुपयांची संपत्ती एसआयटी करणार जप्त Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराडला मिळणार दिलासा? आज जामीन अर्जावर होणार सुनावणी

Walmik Karad : खंडणी प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आज न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात त्याला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वाल्मिक कराडने अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी विष्णू चाटे च्या माध्यमातून मागितली असल्यास आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कंपनी या प्रकरणाची तक्रार 11 डिसेंबर रोजी दिली होती. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडची एसआयटी कोठडी संपणार असल्याने बीड सत्र न्यायालयात या प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. काल 21 जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ 29 नोव्हेंबरचा असल्याचा सांगण्यात येत आहे. याच दिवशी वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि त्याच दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाठेला भेटायला त्याच्या कार्यालयामध्ये गेला होता तेव्हाचा सीसीटीव्ही फुटेझ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपी देखील दिसत आहे.त्यामुळे आज वाल्मिक कराडला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराडला मिळणार दिलासा? आज जामीन अर्जावर होणार सुनावणी Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराड अडचणीत, पुणेनंतर सोलापुरात दुसऱ्या पत्नीच्या नावावर करोडोंची संपत्ती?

Walmik Karad : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड चर्चेत असून आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुणे येथे करोडो रुपयांची संपत्ती आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती तर आता दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरमध्येही संपत्ती असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी X वर पोस्ट करुन वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव असल्याचे काही माध्यमांनी दाखवले आहे. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत क ? ह्याच्या नावाचे हे सोलापुरातले हे 4 सातबारे आहेत. ह्या ज्योति मंगल जाधव कोण आहेत? ह्याचा तपास ED ने करावा. कोणी ह्या जमिनीचे पैसे दिले ह्याचा देखील तपास झाला पाहिजे. अशी मागणी या पोस्टमध्ये त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. आज वाल्मिक कराड जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काही दिवसापूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडावर मकोका लावला आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराड अडचणीत, पुणेनंतर सोलापुरात दुसऱ्या पत्नीच्या नावावर करोडोंची संपत्ती? Read More »