DNA मराठी

Vaishnavi Hagavane

वैष्णवी हगवणे प्रकरण, अनिल कस्पटे यांच्या मागणीनंतर सरकारी वकील म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती

Vaishnavi Hagavane: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी तिचे वडील अनिल कस्पटे यांनी पुढाकार घेत, या गुन्ह्याची प्रभावी व निष्पक्षपणे न्यायालयात मांडणी व्हावी, यासाठी सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता एस. व्ही. मोरे देसाई यांनी गुरुवारी (29 मे) अधिकृत आदेश जारी करून कावेडिया यांची या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. तिच्या मृत्यूमागील कारणे व संभाव्य आरोपींची भूमिका उघड व्हावी, यासाठी तिचे वडील अनिल कस्पटे सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. आर. आर. कावेडिया हे अनुभवी व निष्णात वकील असून त्यांनी याआधी अनेक गुन्हेगारी व सामाजिक प्रकरणांत सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली आहे. त्यामुळे वैष्णवीच्या कुटुंबीयांना या नियुक्तीमुळे न्याय मिळविण्याच्या लढ्याला नवे बळ मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वैष्णवीच्या नातेवाइकांनी केली आहे. आता सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती झाल्याने या खटल्याच्या न्यायालयीन कार्यवाहीस अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. कावेडिया यांचा अनुभव लक्षात घेता, या प्रकरणात न्याय मिळण्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची ठरणार आहे..

वैष्णवी हगवणे प्रकरण, अनिल कस्पटे यांच्या मागणीनंतर सरकारी वकील म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती Read More »

बातमी खोटी, मुयरी जगताप प्रकरणात महिला आयोगाचा मोठा खुलासा

Rupali Chakankar : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मयुरी जगताप हगवणे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले होते तर आता महिला आयोगाने एक पत्र जाहीर करत मयुरी जगताप यांचे आरोप फेटाळले आहे. पुणे जिल्ह्यातील मयत वैष्णवी हगवणे यांची जाऊ मयुरी जगताप हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि लता जगताप यांनी 6 नोव्हेंबर 2024 रोजी ई-मेलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 7 नोव्हेंबर 2024 रोजी या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलिस स्टेशन यांना या प्रकरणात कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिले आहे. पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेऊन 19 मे 2025 रोजी बावधन पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बावधन पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. त्याचप्रमाणे मयुरी जगताप यांच्या कौटुंबिक छळाच्या प्रकरणातही पोलीसांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करुन पुढील तपास केला. पोलीस तपासाबाबत असमाधानी असल्याचे किंवा इतर कुठल्याही बाबींबाबत त्यानंतर तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आयोगाशी संपर्क साधलेला नाही. पौंड पोलिसांनी गुन्हा भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 74,115,352,296, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने 31 जानेवारी 2025 रोजी बावधन पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. मयुरी जगताप यांच्या प्रकरणी 22 मे 2025 रोजी 102/2025 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. तक्रारदारांना याबाबतीत काही आक्षेप असल्यास आणि त्यांनी आयोगाकडे मदत मागितल्यास राज्य महिला आयोग न्यायोचित मदत करण्यास बांधील असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाविरोधात जारी करण्यात येणाऱ्या वृत्ताचे महाराष्ट्र राज्य महिला आयोग खंडन करीत असल्याचेही डॉ. बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी खोटी, मुयरी जगताप प्रकरणात महिला आयोगाचा मोठा खुलासा Read More »

मोठी बातमी! फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अखेर पोलिसांच्या अटकेत…

Rajendra Hagavane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज सकाळी (ता.23 शुक्रवार )अटक केली आहे. गेली सात दिवसांपासून ते पोलिसांना चकवा देत होते. या प्रकरणात वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. हगवणे यांना तत्काळ पोलिसांनी पकडावे आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी होत होती.त्यामुळे पोलिसांवर याबाबत मोठा दबाव आला होता. दरम्यान, वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तीच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी सापळा रचला आणि छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं. सध्या या प्रकरणात चौकशी अधिक वेगाने सुरु झाली असून, सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. लवकरच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अखेर पोलिसांच्या अटकेत… Read More »