Education Loan: आनंदाची बातमी! ‘या’ बँका कमी व्याजदरात देत आहे शैक्षणिक कर्ज; आजच अर्ज करा
Education Loan: या महागाईच्या काळात तुम्ही देखील तुमचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देशातील काही बँका अगदी कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र, या बँकांच्याही अनेक अटी आहेत. आपण या अटी पूर्ण केल्यास, आपण सहजपणे कर्ज घेऊ शकता. या बँका स्वस्त दरात शैक्षणिक कर्ज देत आहेत Indian Bank इंडियन बँक दरवर्षी 8.6 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत आहे. यामुळे तुम्ही कर्ज घेताना इंडियन बँकचा विचार करु शकता. IDFC First Bank IDFC फर्स्ट बँक 9 टक्के वार्षिक व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत आहे. Union Bank Of India युनियन बँक दरवर्षी 9.25 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देते. Bank Of Baroda तर बँक ऑफ बडोदा परदेशात शिक्षणासाठी 9.7 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे. ICICI Bank तर ICICI बँक दरवर्षी 10.25 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत आहे.