DNA मराठी

Team India

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या

Cricket New Rules: सीमारेषेवरील ‘बनी हॉप्स’ झेलबाबत एमसीसीने नवीन नियम केले आहेत.  हा नवीन नियम नेमका आहे तरी काय, हे जाणून घ्या. नवीन नियम काय? कायदा 19.5.2 चे बदल करण्यात येणार आहे.नवीन नियमानुसार असा झेल क्षेत्ररक्षकाने घेतला, तर त्या फलंदाजाला नाबाद ठरविले जाईल. नवीन नियमानुसार झेलसाठी सीमारेषेबाहेर गेलेल्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हवेत असताना चेंडूला फक्त एकदाच स्पर्श करण्याची परवानगी असणार आहे. हा नियम रिले (दोन क्षेत्ररक्षकांनी मिळून घेतलेल्या) झेललाही लागू होईल. 17 जूनपासून लागू होणार नवीन नियम हा नियम 17 जून 2025 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू होईल आणि ऑक्टोबर 2026 पासून अधिकृतपणे एमसीसीच्या कायद्यांमध्ये समाविष्ट केला जाईल. बनी हॉप्स म्हणजे काय? सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक झेल टिपतो आणि त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेबाहेर जात असेल, असे त्याला वाटते, तेव्हा तो चेंडू हवेत उडवितो. पुन्हा उंच उडी मारून (जमिनीला पायाचा स्पर्श होऊ न देता) तो झेल टिपतो आणि पुन्हा चेंडू सीमारेषेबाहेर फेकून पुन्हा झेल टिपतो. या वेगळ्या झेलने ‘बनी हॉप्स’ असे म्हटले जाते.

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या Read More »

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट

IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरनंतर बीसीसीआयने एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा कमी होत असल्याने बीसीसीआयने आयपीएल 2025 पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बीसीसीआयने 12 मे रोजी नवीन वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. 17 मे पासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने एक तात्पुरता नियम लागू केला आहे, ज्यामुळे सर्व संघांना दिलासा मिळाला आहे. परंतु या नियमानुसार, संघांना एका अटीवर सहमती द्यावी लागेल. बीसीसीआयने नवीन नियम लागू केला उर्वरित 17 सामन्यांसाठी बीसीसीआयने एक नवीन नियम लागू केला आहे. बीसीसीआयने सर्व संघांना बदली खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी दिली आहे. अहवालानुसार, यापूर्वी, लीग टप्प्यातील 12 सामन्यांनंतर, खेळाडू दुखापती, आजार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बाहेर असल्यास संघांना बदली खेळाडूंवर स्वाक्षरी करता येत नव्हती. या हंगामात आतापर्यंत अनेक संघांनी 12 सामने खेळले आहेत. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता, बोर्डाने उर्वरित सामन्यांसाठी यावर सूट दिली आहे. याचा अर्थ असा की संघ आता नवीन खेळाडूला करारबद्ध करू शकतात. ही स्थिती संघांसमोर असेल या नियमासोबतच बीसीसीआयने संघांसमोर एक अटही ठेवली आहे. बोर्डाने आधीच सांगितले आहे की हे नियम फक्त तात्पुरते मानले पाहिजेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या संघाने एखाद्या खेळाडूला करारबद्ध केले तर ते फक्त या हंगामासाठी असेल. तसेच संघ त्याला पुढील हंगामासाठी राखू शकत नाहीत. जर एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर संघ त्याला थांबवू शकत नाही आणि पुढच्या हंगामातच त्याला खरेदी करावे लागेल, जिथे तो खेळाडू पुन्हा त्याच संघासोबत खेळू शकेल अशी आशा फारच कमी असेल. हा नियम सर्व 10 संघांसाठी आहे. पण याचा फायदा फक्त 7 संघांनाच होईल. कारण तीन संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स बाहेर पडले आहेत. या हंगामात बाहेर पडणारा पहिला संघ सीएसके आहे.

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट Read More »

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर

IPL 2025 : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी केएल राहुलने जबरदस्त कामगिरी केली आहे. नुकतंच तो भारतात परतला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माहितीनुसार, त्याने आयपीएल 2025 मध्ये कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, मात्र त्याने ऑफर स्वीकारण्यास नकार दिला. अक्षर पटेल कर्णधार होणार?तर दुसरीकडे केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारल्यामुळे अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीची कमान सांभाळू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला 14 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. कारण राहुलला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. 2020-21 मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि 2022 -2024 पर्यंत तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे तो दिल्लीची कमान सांभाळणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळू इच्छितो, त्यामुळे राहुलचा हा निर्णय दिल्लीसाठीही किती फायदेशीर ठरणार हे पाहावे लागेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर Read More »

भारताचा ‘शानदार’ विजय, न्यूझीलंडला धक्का देत पटकावले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 6 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने 76 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले. पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून न्यूझीलंडला बॅकफूटवर नेले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली, पण त्यानंतर ग्लेन फिलिप्सने गिलचा एक शानदार झेल घेतला. 50 चेंडूत 31 धावा काढून गिल बाद झाला. यानंतर, विराट कोहलीने फलंदाजीला आला पण तो फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने श्रेयस अय्यरसह डावाला पुढे नेले मात्र मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्ट्यांच्या मागे बाद झाला. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने 62 चेंडूत 48 धावा केल्या, पण रचिन रवींद्रने एक शानदार झेल घेतला. यानंतर अक्षर पटेलने 20 चेंडूत 29 धावा केल्या, पण तोही बाद झाला. हार्दिक पांड्या 18 चेंडूत 18 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. राहुलने 33 चेंडूत 34 धावा केल्या, तर जडेजा 6 चेंडूत 9 धावा केल्या.

भारताचा ‘शानदार’ विजय, न्यूझीलंडला धक्का देत पटकावले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद Read More »

Champions Trophy 2025: भारताची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल झालेल्या न्युझीलँड विरुद्ध बांगलादेश सामन्यात न्युझीलँडने बांगलादेशचा पाच विकेटने पराभव केला आहे. या पराभवानंतर ग्रुप ए मधून न्युझीलँड आणि भारताने सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे तर पाकिस्तान आणि बांगलादेशच्या स्पर्धेतून बाहेर झाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला एकामागून एक दोन मोठे पराभव पत्करावे लागले आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर मोठा पराभव केला तर 23 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानला 29 वर्षांत प्रथमच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. तो ग्रुप स्टेजच्या पुढे जाऊ शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान संघ त्यांचे प्रशिक्षक आकिब जावेद यांना पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच काढून टाकणार आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर संघाला अनुभवी खेळाडूंकडून तीव्र टीका सहन करावी लागली. जावेद मियांदाद म्हणाले, “सिस्टम, निवडकर्त्यांना आणि या सर्वांना दोष देणे निरुपयोगी आहे. प्रश्न असा आहे की निवडलेल्या खेळाडूंमध्ये काही कमतरता आहे का? पीसीबी त्यांची काळजी घेत नाही का? त्यांना पुरेसे पैसे दिले जात नाहीत का? मग मोठ्या सामन्यांमध्ये आणि स्पर्धांमध्ये कामगिरी करण्याची आवड, उत्साह आणि व्यावसायिक वृत्ती कुठे आहे? सत्य हे आहे की सामना सुरू होण्यापूर्वीच आमचे खेळाडू दबावाखाली होते. भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याच्या मनःस्थितीत कोणीही दिसत नव्हते.” बांगलादेशला हरवून न्यूझीलंड उपांत्य फेरीतसोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी विजय आवश्यक होता. रचिन रवींद्रच्या चौथ्या एकदिवसीय शतकामुळे न्यूझीलंडने बांगलादेशच्या कठीण आव्हानावर सहज मात केली. बांगलादेशने दिवसाची सुरुवात चमकदार केली पण मायकेल ब्रेसवेलने खेळाचा मार्ग बदलला. ब्रेसवेलने सलग 10 षटके गोलंदाजी केली आणि त्याच्या स्पेलमध्ये 26 धावा देऊन 4 बळी घेतले. बांगलादेशकडून नाझिमुल शांतोने सर्वाधिक 77 धावा केल्या तर जकार अलीने 45 धावा केल्या. त्यामुळे संघाने 50 षटकांत 9 बाद 236 धावा केल्या. 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खूपच खराब झाली. विल यंग आणि केन विल्यमसन लवकर बाद झाले. यानंतर, रॅचिन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी 57 धावांची भागीदारी करून संघाचा कमबॅक केला.न्यूझीलंडच्या विजयासह बांगलादेशही स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Champions Trophy 2025: भारताची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर Read More »

Champions Trophy 2025: भारतीय संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसणार नाही जसप्रीत बुमराह

Champions Trophy 2025: बीसीसीआयने मोठा निर्णय घेत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातून जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जयस्वाल वगळण्यात आले आहे. तर तर वरुण चक्रवर्तीला आणि हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय यशस्वी जयस्वालच्या जागी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम संघबीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताच्या संघात रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये जगातील अव्वल आठ एकदिवसीय संघ सहभागी होतील. भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने, आयसीसीने हायब्रिड मॉडेलला मान्यता दिल्यामुळे, भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारताच्या गट-टप्प्यात बांगलादेश (20 फेब्रुवारी), पाकिस्तान (23 फेब्रुवारी) आणि न्यूझीलंड (2 मार्च) विरुद्धचे सामने आहेत. जर भारताने आगेकूच केली तर उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्च रोजी होतील, तर अंतिम सामना 9 मार्च रोजी होईल.

Champions Trophy 2025: भारतीय संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसणार नाही जसप्रीत बुमराह Read More »

ICC Champions Trophy 2025 : BCCI घेणार मोठा निर्णय, मोहम्मद सिराजला मिळणार संधी?

ICC Champions Trophy 2025 : क्रिकेटच्या चाहतांचे लक्ष लागून असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. आज म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी आयसीसीने अंतिम संघ सादर करण्याची अंतिम तारीख निश्चित केली होती. तथापि, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल सस्पेन्स कायम आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयला आजच त्यांचा अंतिम संघ सादर करावा लागेल. पण आतापर्यंत बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. जर बुमराह स्पर्धेतून बाहेर पडला तर त्याच्या जागी मोहम्मद सिराज टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. या स्पर्धेसाठी सिराजची निवड झाली नाही. त्यामुळे आता तो संघात येऊ शकतो. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहने नुकतेच बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या कंबरचे स्कॅनिंग केले. बुमराहबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय कर्मचारी निवडकर्त्यांना आणि संघ व्यवस्थापनाला भेटतील. बीसीसीआय आज म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी बुमराहबाबत निर्णय घेईल. आता बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल. जर तो तंदुरुस्त नसेल तर टीम इंडियाला त्याची उणीव नक्कीच जाणवेल. बुमराहबाबतचा निर्णय आज येईल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी सर्व संघांनी त्यांचे संघ जाहीर केले होते. परंतु आयसीसीने सर्व संघांना अंतिम संघ सादर करण्यासाठी 11 फेब्रुवारीची अंतिम मुदत दिली होती. आज, सर्व संघ त्यांच्या जखमी खेळाडूंच्या बदलीची घोषणा करणार आहेत. बीसीसीआय आज जसप्रीत बुमराहबाबतचा निर्णय जाहीर करेल. बुमराहबाबत लवकरात लवकर निर्णय होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मोहम्मद सिराजला संधी मिळणार?जेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी टीम इंडियाची घोषणा केली तेव्हा मोहम्मद सिराज त्या संघात नव्हते. जेव्हा कर्णधाराला विचारण्यात आले की सिराज तिथे का नाही, तेव्हा त्याने सांगितले की सिराज नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो. पण जुन्या चेंडूवर तो कमी प्रभावी आहे. या कारणास्तव, त्याला घेतले गेले नाही. पण जर बुमराह तंदुरुस्त नसेल तर मोहम्मद सिराजचा टीम इंडियामध्ये समावेश निश्चित मानला जात आहे. कारण सिराजने बुमराह आणि शमीच्या उपस्थितीत अनेकदा गोलंदाजीची जबाबदारी घेतली आहे.

ICC Champions Trophy 2025 : BCCI घेणार मोठा निर्णय, मोहम्मद सिराजला मिळणार संधी? Read More »

Concussion Substitute Controversy : टीम इंडियाने चीटिंग केली? हर्षित राणाला कन्कशन सबस्टिट्यूट बनवल्याबद्दल वाद चिघळला

Concussion Substitute Controversy: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 15 धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 19.4 षटकांत 166 धावांवर आटोपला. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक 3 बळी घेणाऱ्या हर्षित राणाने, जो कन्कशन पर्याय म्हणून आला होता, तो बाद झाला. त्याने मधल्या षटकांमध्ये आपल्या शानदार गोलंदाजीने सामना बदलून टाकला. पण आता त्याला कन्कशन सबस्टिट्यूट बनवल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत जेव्हा इंग्लंडच्या कर्णधाराला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा बटलरने ही लाईक टू लाईक रिप्लेसमेंट नव्हती. असं उत्तर दिले. आम्ही याच्याशी सहमत नाही. असं देखील बटलर म्हणाला. पुढे बोलताना तो म्हणाला की, शिवम दुबेचा चेंडूचा वेग ताशी 25 मैलांनी वाढला आहे किंवा हर्षित राणाने त्याची फलंदाजी खूप सुधारली आहे. शेवटी बटलर म्हणाला, हे सगळं सामन्याचाच एक भाग आहे. शेवटी आपण सामना जिंकायला हवा होता, जे होऊ शकले नाही. भारताकडून शिवम दुबेने 34 चेंडूत 53 धावांची महत्त्वाची खेळी केली आणि संघाला 181 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजी करताना, 20 व्या षटकातील पाचवा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. कन्कशन टेस्ट न घेता, तो सामन्याचा शेवटचा चेंडू खेळला आणि धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तो मैदानावर आलाच नाही. त्याच्या जागी राणाने क्षेत्ररक्षण केले आणि नंतर गोलंदाजी करून सामना बदलला. त्याने 4 षटकांत 33 धावा देत 3 बळी घेतले. राणाने लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन यांच्या विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणले. आंतरराष्ट्रीय टी20 इतिहासात हर्षित राणा हा कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून पदार्पण करणारा पहिला खेळाडू ठरला. सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर राणा म्हणाला की, इंग्लंडच्या डावाच्या दुसऱ्या षटकात गौतम गंभीरने त्याला सांगितले होते की तो कन्कशन पर्याय म्हणून मैदानात उतरणार आहे. तथापि, 11 व्या षटकानंतर याची अधिकृत पुष्टी झाली आणि हर्षित गोलंदाजी करायला आला आणि दुसऱ्याच चेंडूवर लिव्हिंगस्टोनला बाद केले. यानंतर, सामन्यादरम्यान या मुद्द्यावर सतत चर्चा होत राहिली.

Concussion Substitute Controversy : टीम इंडियाने चीटिंग केली? हर्षित राणाला कन्कशन सबस्टिट्यूट बनवल्याबद्दल वाद चिघळला Read More »

Team India: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 12 जानेवारीला होणार भारतीय संघाची घोषणा, कोणाला मिळणार संधी?

Team India: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या पराभवानंतर आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बीसीसीआय हंगामी संघाची निवड करणार आहे. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे, जी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 12 जानेवारीपर्यंत त्यांचा हंगामी संघ निवडावा लागेल आणि बोर्ड 13 फेब्रुवारीपर्यंत या संघात बदल करू शकतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सर्व संघांना 12 जानेवारीपर्यंत त्यांची तात्पुरती टीम निवडून पाठवावी लागेल, परंतु त्यांना हवे असल्यास ते 13 फेब्रुवारीपर्यंत त्यात बदल करू शकतात. आयसीसी 13 फेब्रुवारीलाच या संघांची यादी जाहीर करेल की नाही हे आता संघांवर अवलंबून आहे. यावेळी ऑस्ट्रेलियात आपल्या चेंडूने चमकदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहलाही व्हाईट बॉलच्या फॉरमॅटमध्ये प्रमोशन मिळू शकते आणि त्याला या संघाचा नवा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. असे झाल्यास निवडकर्ते हार्दिक पंड्या आणि केएल राहुलकडे दुर्लक्ष करतील कारण हे दोन्ही खेळाडू 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे उपकर्णधार होते. यापूर्वी हार्दिक पंड्या 2023 च्या वनडे विश्वचषकाचा उपकर्णधार होता, पण दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर होता, तेव्हा ही जबाबदारी केएल राहुलकडे देण्यात आली होती. पंड्या हा नुकताच टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा उपकर्णधार होता. या स्पर्धेसाठी संघ निवडताना निवडकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. यशस्वी जैस्वाल आणि नितीश कुमार रेड्डी यांसारख्या युवा फलंदाजांच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीमुळे त्यांनी वनडे संघात निवड होण्याचा दावाही केला आहे.

Team India: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 12 जानेवारीला होणार भारतीय संघाची घोषणा, कोणाला मिळणार संधी? Read More »

Rohit Sharma होणार निवृत्त, मुख्य निवडकर्ता आगरकर घेणार मोठा निर्णय?

Rohit Sharma: भारतीय कर्णधार रोहित शर्माची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये बॅट आतापर्यंत खूप फ्लॉप ठरली आहे. त्याने आतापर्यंत 3 सामन्यात केवळ 22 धावा केल्या आहेत. रोहितच्या या खराब फॉर्ममध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. सातत्याने धावा न केल्याने निराश झालेल्या रोहितने आता कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतोमीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. अशा स्थितीत सिडनीतील शेवटचा सामना हिटमॅनच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरू शकतो. रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता आणि माजी खेळाडू अजित आगरकर मेलबर्नमध्ये असून तो रोहित शर्माशी त्याच्या भविष्याबद्दल बोलू शकतो. रिपोर्टनुसार, जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला नाही, तर रोहित शर्मा टेस्ट फॉरमॅट सोडू शकतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या 1-1अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत रोहितचे कसोटी भवितव्य त्याच्या फॉर्मवर आणि भारताच्या विजयावर अवलंबून आहे. रोहितला कारकीर्द वाचवायची असेल तर त्याला मेलबर्न आणि सिडनीमध्ये अप्रतिम कामगिरी करावी लागेल. त्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा सामना असणार आहे. रोहित टी-20आधीच निवृत्त झाला आहेरोहित शर्माने पहिल्यांदाच T20I ला अलविदा केला आहे. भारताने यावर्षी ऐतिहासिक T20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहितच्या निवृत्तीनंतर चाहते खूपच निराश झाले होते. आता हा रिपोर्ट जाणून हिटमॅनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आता रोहितने आगामी डावात फलंदाजीने खळबळ माजवावी आणि भारतासाठी महत्त्वाची खेळी खेळून संघाला विजयाकडे नेले पाहिजे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. हिटमॅन रोहित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना खेळला नव्हता. यानंतर त्याने फलंदाजीचा क्रमही बदलला आणि मधल्या फळीत फलंदाजी केली. मात्र, रोहितच्या खराब फॉर्मने त्याची साथ सोडली नाही आणि तो आतापर्यंत बॅटने मोठी खेळी खेळू शकला नाही.

Rohit Sharma होणार निवृत्त, मुख्य निवडकर्ता आगरकर घेणार मोठा निर्णय? Read More »