DNA मराठी

Satyajeet Tambe Update

Satyajeet Tambe : नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा, सत्यजीत तांबे आक्रमक

Satyajeet Tambe : संगमनेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला जात असून, याला आमदार सत्यजीत तांबे यांनी विरोध केला असून हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी सभागृहात केली आहे. आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे सोयीचे नसून, अनेक गावांतील नागरिकांसाठी ते गैरसोयीचे ठरणार आहे. या कार्यालयाला जोडण्यात येणाऱ्या गावातील नागरिकांना शहर ओलांडून पुढे 20-25 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वी बुद्रुकला जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जाणार असून, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रस्तावाला सभागृहात तीव्र विरोध केला आहे. “जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित करणे, हे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. प्रस्तावावर नागरिकांची नाराजीसंगमनेर तालुक्यातील नागरिकांनी या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “प्रशासनाने जनतेच्या सोयीसुविधांचा विचार न करता हा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Satyajeet Tambe : नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा, सत्यजीत तांबे आक्रमक Read More »

Satyajeet Tambe : मान्यता मिळूनही ‘ती’ दोन रुग्णालये कागदावरच का?… आ. सत्यजीत तांबे

Satyajeet Tambe – राज्यातील सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट असताना श्रीगोंदा आणि संगमनेर येथे सरकारी रुग्णालयांची वानवा आहे या दोन्ही रुग्णालयांना मान्यता मिळूनही ही रुग्णालये अद्याप कागदावरच आहेत. या रुग्णालयांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यांमधील लाखो रुग्णांना दिलासा द्या, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली. फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व संगमनेर येथील 50 ते 100 खाटांच्या शासकीय रुग्णालयांचे बांधकाम अजूनही प्रलंबित आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दोन्ही ठिकाणी रुग्णांसाठी रुग्णालयांची आवश्यकता असून ग्रामस्थांना 60 ते 50 किलोमीटर जावे लागत आहे.  इतकी वणवण करून देखील रुग्णालय जवळपास उपलब्ध नसल्याने रुग्णांचा रस्त्यातच जीव जातो. या दोन्ही रुग्णालयांच्या बांधकामांना सरकारने गेल्या वर्षीच मान्यता दिली असून त्याचे काम अजूनपर्यंत पूर्ण का झाले नाही? असा प्रश्न आ. तांबे यांनी आरोग्य मंत्र्यांना केले. यावर बोलताना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, श्रीगोंदा व संगमनेर येथे सद्यस्थितीत 30 खाटांचे रुग्णालय कार्यान्वयीत आहे. श्रीगोंदा येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय बांधकामास शासन निर्णय फेब्रुवारी 2022 प्रमाणे 1 हजार 60 लक्ष रुपयांच्या बांधकामास मान्यता देण्यात आली आहे.  तसेच घुलेवाडी (संगमनेर) येथे 100 खाटांच्या 2 हजार 970 लक्ष रूपयांच्या रुग्णालय बांधकामास मार्च 2022 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर बांधकामाची निविदेबाबतची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यास्तरावर सुरू आहे.

Satyajeet Tambe : मान्यता मिळूनही ‘ती’ दोन रुग्णालये कागदावरच का?… आ. सत्यजीत तांबे Read More »