DNA मराठी

Sanjay Raut

sanjay raut

Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस 

Sanjay Raut on PM Modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जुन्नर अत्याचार प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. जुन्नरमध्ये अजूनही संतप्त वातावरण असून, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात सरकारची भूमिका काय, असा सवाल राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्हाला काही वाटत नाही का? याबद्दल तुम्हाला काही बोलावंसं वाटत नाही का?” असा सवाल करत राऊत यांनी फडणवीस यांच्यावर ‘फेल्युअर मुख्यमंत्री’ अशी टीका केली. पोलिसांनीही या प्रकरणात हात वर केल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे सेनेचे स्वीकृत नगरसेवक साहिल देविदास चौघुले यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचा दावा राऊत यांनी केला. संबंधित मुलगी न्यायासाठी विविध ठिकाणी जाऊन थकली असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्यांना रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत चार-चार तास बसवून ठेवतात आणि प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करत राऊत यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले. “नवी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण मार्गी लावावे, नाहीतर मी हे प्रकरण मार्गी लावेन,” असे ते म्हणाले. तसेच, एकनाथ शिंदे या प्रकरणात कोणाला वाचवत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून वरून दबाव येत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भाष्य टाळले सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत बोलताना राऊत यांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. मंत्र्यांच्या विद्यापीठ दौऱ्यावर टीका मंत्र्यांच्या विद्यापीठ दौऱ्यावरही राऊत यांनी टीका केली. पंतप्रधानांचा दौरा कठीण असताना मंत्र्यांनी खात्याचे काम सोडून विद्यापीठात जाण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. “विद्यापीठात जाण्यापेक्षा महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये या मंत्र्यांनी जावे,” असे राऊत म्हणाले. भाजपसोबत आता जनरेशन झेड येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करू द्या, असे म्हणत त्यांनी या दौऱ्याची खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदींवरही निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसावरूनही राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस असेल. त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत,” असे ते म्हणाले. 17 सप्टेंबरनंतर मोदींना कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल, हे कळेल, असा इशाराही त्यांनी दिला. अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असे सांगत राऊत यांनी मोदी आणि शाह यांच्यावरही टीका केली. मोदींच्या वाढदिवशी समर्थकांनी उत्सव साजरा करावा; त्यानंतरच्या राजकीय घडामोडी पाहा, असे ते म्हणाले. चंपत राय यांच्यावरूनही टीका चंपत राय यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील सरकारवर टीका करताना राऊत यांनी महाराष्ट्रातही ‘चंपत राय’ असल्याचे म्हटले. बलात्काराच्या आरोपींना ज्याप्रमाणे क्लीनचिट दिली जाते, त्याचप्रमाणे चंपत राय यांना क्लीनचिट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पुण्यात शनिवारी मोरगाव येथे रामरक्षा आंदोलन करण्यात येणार असून, आपण स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस  Read More »

sanjay raut

Sanjay Raut: संजय राऊत यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका

Sanjay Raut: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, विरोधी पक्षातील सर्व खासदारांनी मिळून “हरवले आहेत” या आशयाची जाहिरात देण्याचा निर्णय घेतला आहे. “देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह हरवले आहेत. संसदेत या दोघांचे खासदारांनाही दर्शन झाले नाही. संसद चालवायची नसेल तर ती इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरच चालवा. २० हजार कोटी रुपये खर्च करून संसद भवन उभारण्याची गरज काय होती?” असा सवाल त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले, “जे गृहमंत्री ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देतात, त्यांनी त्या पदावर राहावे का, याचा विचार त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी करायला हवा. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार आहोत.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत ते म्हणाले, “पुण्यात रात्रीच्या अंधारात गेले, पण जनतेसमोर का येत नाहीत? दहशतीच्या मार्गाने निवडणूक जिंकली तर तीच दहशत नंतर छळते.” संघाच्या विचारधारेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “संघाची विचारधारा भारतीय संविधानाला मानत नाही. ५२ वर्षे संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकावला गेला नव्हता. त्यांना संविधान संपवायचे आहे. मात्र आंदोलन संविधानानुसार नव्हते, असे म्हणणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे.” यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना आवाहन करत, “जंतर-मंतरवरील आंदोलन संविधानानुसार होते की नाही, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. तसेच अतुल लिमये यांच्या वक्तव्याशी ते सहमत आहेत का, हेही सांगावे,” अशी मागणी केली. राऊत यांनी दावा केला की, “संघातून वेगळा आवाज निघत असेल, तर मोदींनी संघात आपली माणसे पेरली आहेत.” तसेच, “आमच्या पराभवासाठी ८० हजार बैठका घेण्यात आल्या,” असाही आरोप त्यांनी केला. राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “राम मंदिरासाठी सर्वांनी बलिदान दिले आहे, केवळ संघाने नाही.” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, “फडणवीसांनी आधी केंद्रात येऊन शिक्षणमंत्री म्हणून काम करावे आणि त्यानंतर पंतप्रधानपदाचा विचार करावा. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. सध्या मोदींच्या नजरेत फडणवीस असल्याचे दिसते.” स्वतःविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना राऊत म्हणाले, “माझ्यावर नेमका कोणत्या कारणासाठी गुन्हा दाखल झाला, हे मला माहिती नाही. आमच्यावर किती गुन्हे दाखल करणार? आमचे आयुष्यच गुन्ह्यांशी लढण्यात गेले आहे.” जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, “जयकुमार गोरे यांनी ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य कोणत्या आचारसंहितेत बसते? ते शिवसेना प्रमुख आहेत. आम्ही त्याला उत्तर दिले तर त्याला हुकूमशाही म्हटले जाते.” शेवटी त्यांनी इशारा देत म्हटले, “त्यांनी माझ्या आसपासही फिरू नये. मला ओळखायचा प्रयत्न केला तर ते स्वतः अडचणीत येतील.”

Sanjay Raut: संजय राऊत यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका Read More »

sanjay raut

Sanjay Raut on BJP : उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय फडणवीसांच्या हातात नव्हता; संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut on BJP : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण विधेयकावर, शिक्षण व्यवस्थेवर, विद्यार्थी आंदोलन, संसद अधिवेशन तसेच राज्यातील राजकारणावर जोरदार टीका केली. नवीन शिक्षण विधेयकात केवळ शिक्षा आणि दंडाच्या तरतुदी वाढवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या कायद्यामुळे परीक्षा व्यवस्था ‘फुलप्रूफ’ होणार नसल्याचे म्हटले. राऊत म्हणाले की, पेपरफुटी प्रकरणातील शिक्षेची मुदत एक वर्षांवरून दहा वर्षे आणि दंडाची रक्कम एक कोटींवरून दहा कोटी रुपये करण्यात आली आहे. मात्र, फक्त आकडे बदलल्याने समस्या सुटणार नाही. सरकार कायदे करते, पण त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षांतर कायद्याचा दाखला देत त्यांनी सरकारवर कायद्याचा केवळ दिखावा केल्याची टीका केली. विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत राऊत यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार, मुलींशी गैरवर्तन आणि आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारला संसदेत प्रश्न विचारले जाणार असल्याचे सांगितले. इतक्या घटना घडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, देशातील आधुनिक शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात झाली होती. त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी आधुनिक भारत घडवण्याचे काम केले. मात्र, गेल्या दहा वर्षांत शिक्षण व्यवस्थेला मागे नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. आयआयटीसारख्या संस्थांची स्थापना काँग्रेस सरकारांनी केली, तर सध्याच्या सरकारने शिक्षणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याचा दावा त्यांनी केला. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राऊत यांनी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना जबाबदारी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. नंदन नीलेकणी यांच्यासारख्या तज्ज्ञाला शिक्षणमंत्री करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातील राजकारणावर बोलताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठे विधान केले. “भाजपने गुणवत्तेच्या आधारे शिक्षणमंत्री निवडायचा ठरवला, तर मोदी यांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांचेच नाव असेल,” असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचाही निर्णय फडणवीस यांच्या हातात नव्हता, असा दावाही त्यांनी केला. ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमावर टीका करताना राऊत म्हणाले की, राजीनामा हा विद्यार्थी आंदोलनाचा विजय आहे. हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, अनेकांनी आत्महत्या केल्या, अनेकांवर लाठीमार झाला. त्यामुळे धन्यवाद विद्यार्थ्यांचे मानायला हवेत, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या पत्राचा उल्लेख करताना त्यांनी दिल्लीतील घटनांची जबाबदारी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर असल्याचे म्हटले. दिल्ली पोलिसांना आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनच दिले जातात, असेही त्यांनी नमूद केले. भाजपच्या आंदोलनापासून अलिप्त राहण्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या विरोधात उभे राहण्याची भाजपची हिंमत नव्हती. आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपमध्येही मतभेद निर्माण झाले असून काही भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केला. संसद अधिवेशनाबाबत बोलताना त्यांनी सरकार अजूनही धक्क्यातून सावरले नसल्याचा दावा केला. सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांनीही दबाव वाढवल्याचे सांगत आता केंद्र सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut on BJP : उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय फडणवीसांच्या हातात नव्हता; संजय राऊतांचा मोठा दावा Read More »

sanjay raut

Sanjay Raut on BJP : मोदी सरकारवर संजय राऊतांचा घणाघात; भाजपला थेट इशारा

Sanjay Raut on BJP : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (Shivsena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शवला. कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत म्हणाले की, नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे देशातील तरुणांमध्ये मोठा असंतोष आहे. लोकशाहीत नागरिकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असून, आंदोलकांवर कारवाई करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी अभिजीत दिपके यांनीही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जंतर-मंतर परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करत लोकशाहीत विरोधी मतांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर राजकारण न करता ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे.

Sanjay Raut on BJP : मोदी सरकारवर संजय राऊतांचा घणाघात; भाजपला थेट इशारा Read More »

img 20260625 wa0011

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी

Sanjay Raut : उबाठा खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या शिवीगाळीने आणि अर्वाच्च भाषेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला आहे. चिथावणीखोर भाषणाने राऊत स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत. लोकप्रतिनिधी, माता भगिनींचा अवमान करणाऱ्या आणि त्यांना जाहीर धमक्या देणाऱ्या खासदार राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला सेनेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. खासदार राऊतांवर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी महिला सेनेच्या नेत्यांनी दिला. शिवसेना महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यात शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, राष्ट्रीय सचिव शायना एन सी, उपनेत्या व बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वास राव, उपनेत्या सुवर्णा करंजे, कला शिंदे, मुंबई मनपा विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी तसेच अनेक आजी माजी नगरसेविका, सर्व महिला विभागप्रमुख इ. उपस्थित होत्या. शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या उबाठाच्या सर्व खासदारांना उद्देशून खासदार राऊत यांनी जाहीर शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून राऊत यांनी विकृतीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, अशी टीका म्हात्रे यांनी केली. राऊत यांनी महिलेला फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडिओ महाराष्ट्राने ऐकली आहे. महिलांविषयी आकस आणि सूडबुद्धीने राऊत सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कितीही शिवीगाळ केली तर आपले कोणीही, काही करु शकत नाही, असा त्यांचा समज झाला असून ते कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९, १९६, ३५१, ३५२, ३५३, ३५६ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि राऊत यांना अटक करावी, अशी लेखी मागणी शिवसेना महिला सेनेकडून पोलीस आयुक्तांकडे केल्याचे म्हात्रे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, नुकताच समाज माध्यमांवर राऊत यांनी बंदुकीसोबत फोटो पोस्ट केला होता. राऊत यांच्याकडे शस्त्रे आहेत का? ते समाज माध्यमांवर फोटो पोस्ट करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? याची पोलीसांनी चौकशी करावी. राऊत लोकप्रतिनिधींना आईबहिणीवरुन शिवीगाळ करतात, माध्यमांच्या माइकवर थुंकतात, खासदारांचा अर्वाच्च भाषेत उल्लेख करतात, माता भगिनींना रक्तावरुन बोलतात आणि अवमान करतात. अशा विकृत लोकांना वेळीच चाप बसावा, यासाठी महिला सेनेने निवेदन दिले. राऊत यांना अटक केल्यानंतर ठाण्यातील मनोरुग्णालयात पाठवावे, शिवसेनेकडून राऊत यांच्यासाठी मनोरुग्णालयातील एक खाट राखून ठेवल्याचा टोला म्हात्रे यांनी लगावला. राऊत यांनी उबाठा पक्ष संपण्याची सुपारी घेतल्याची टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील महिलांचा यापुढे अवमान केल्यास शिवसेना महिला सेना त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी Read More »

sanjay raut

Sanjay Raut on Ajit Pawar: आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल, अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये घेऊन जाणारे विमान अपघात बातमी समजली. ⁠दुर्दैवाने ही बातमी कानावर आली. त्यांची गरज आज महाराष्ट्राला होती मात्र आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल. रोखठोक दिलखुलास कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता होता. बारामती आणि त्यांच नात होत त्याच बारामती मध्ये मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण केले. ⁠उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेहमी म्हणायचे कॅबिनेट ला पूर्ण अभ्यास करून येणार नेता. ⁠शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणले. ⁠त्या नेत्याचा असा अकाली मृत्यू होईल असे वाटले नव्हते. ⁠त्यांच्या कामाची दृश्य नेहमी पाहायली उत्तम वक्ते होते रोख ठोक बोलणारे मिश्किल टिपणी करून आपलेसे करणे असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, उमद्या वयात असे नेते अनेक गेले. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा होती. ⁠दुर्दैवाणे मुख्यमंत्री झाले नाही. महाराष्ट्राला अजून काय पहाव लागेल माहिती नाही. टीका आम्ही एकमेकांवर करत होतो मात्र त्यांनी शांत राहून उत्तर दिले. ⁠महाराष्ट्राला अजून त्यांच्याकडून काम करून घेता आले असते. ⁠काका पुतण्या एकत्र लढतात याचा आनंद होता मात्र तो फार काळ टिकला नाही. पवार कुटुंबावरच हा मोठा आघात आहे.

Sanjay Raut on Ajit Pawar: आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल, अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊत काय म्हणाले? Read More »

thackeray

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध

Raj Uddhav Thackeray Interview : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत नुकतीच चित्रित झाली आहे. ही ‘दणदणीत आणि खणखणीत’ मुलाखत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीचा टीझर ‘सामना’च्या अधिकृत X हँडल (@SaamanaOnline) वर शेअर करण्यात आला आहे. टीझरमध्ये राज ठाकरे म्हणतात, “राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये!” तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नयेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीला विशेष महत्त्व आहे. मुलाखतीचा पहिला भाग गुरुवार, 8 जानेवारी 2026 रोजी ‘सामना’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित होणार आहे. ही संयुक्त मुलाखत ठाकरे बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याचे प्रतीक मानली जात आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने तसेच भाजप – शिवसेना शिंदे गट युतीसह आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध Read More »

sanjay raut

Sanjay Raut on NCP Alliance: पुण्यात दोन्ही NCP एकत्र येणार? संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut on NCP Alliance : पुण्यातील राजकारणात सध्या हाय वॉल्टेज ड्रामा सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेसाठी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आता अजित पवार कोणतीही सुरक्षा न घेता कुठे तरी निघून गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे मला माहिती नाही असं म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला माहिती नाही, त्यांच्या पक्षात काय चाललय त्यावर मी काय बोलणार. अजून तिथे काही घडत नाही आहे. तर दुसरीकडे यावेळी राऊत यांनी मुंबईमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी बरोबर युतीसाठी आमची सकारात्मक चर्चा झाली असून त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुतेक जागा त्यांना दिल्यात असल्याची माहिती दिली आहे. तसेच आमच्या युतीत काही अडचण या क्षणी दिसत नाही, मनसेच्या गोटातल्या काही जागा आहेत . पण आम्ही त्याचं समाधान केलंय. आमच्या सोबत असावेत आमची इच्छा आहे. आमच्या वाट्याच्या जागा दिल्यात, आमचं नुकसान झालं पण ठीक आहे ते चालेल. आमच्या अनेक जागा मनसेला सीटिंग आहेत, आमचेही लोक नाराज झाले, पण युतीमध्ये या गोष्टी पहायच नाही असं संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेना मनसे युती आहे. राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे. जागा वाटप पूर्ण झालं आहे पण ठाण्यात महत्व वेगळं आहे, भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचा आहे. लोकसभा विधानसभेच गणित वेगळं होतं तिथे आमची केवळ भाजपशी लढाई असेल असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on NCP Alliance: पुण्यात दोन्ही NCP एकत्र येणार? संजय राऊत स्पष्टच बोलले Read More »

shankarrao gadakh

Shankarrao Gadakh : नगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का, गडाखांचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षाकडून लढवणार निवडणूक

Shankarrao Gadakh : शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा नगरपंचायतची निवडणूक पक्षाचे मशाल चिन्हाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माजी मंत्री गडाख यांच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गडाख आता शिवसेना सोडण्याची तयारी करत असल्याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली आहे. तर दुसरीकडे गडाख यांनी यापूर्वी सन 2017 मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते. विधानसभेत विजयी झाल्यानंतर अपक्ष असलेले आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला व मंत्रिपद मिळवले होते. मात्र, आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Shankarrao Gadakh : नगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का, गडाखांचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षाकडून लढवणार निवडणूक Read More »

navnath ban

जनतेनं उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवलं; नवनाथ बन यांचा हल्लाबोल

Navnath Ban : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला भाजप नेते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे माध्यम प्रमुख नवनाथ बन म्हणाले की “उबाठा गटाच्या 52 पत्त्यांच्या गड्डीत सर्वच पत्ते जोकरचे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये. तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीवेळी म्हणाले होते ‘एकतर तू राहशील किंवा मी राहीन’. मात्र जनतेने उद्धव ठाकरे यांना महाजोकर करून घरी बसवले आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले. ही वस्तुस्थिती माकडछाप संजय राऊत यांनी ध्यानात घ्यावी.” ते पुढे म्हणाले की “देवेंद्र फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत. त्यामुळेच तुम्हाला झळ बसत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत खरा महाजोकर तुम्ही आणि तुमचा गटच आहे, हे मुंबईकर आणि मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.” मुंबईतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर नवनाथ बन म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत, त्यामुळे संजय राऊत यांनी कमिशनच्या बाता मारू नयेत. मातोश्री-2 कुणाच्या कमिशनवर उभी राहिली, याचं उत्तर आधी द्या. मृतावरच्या टाळुवरील लोणी खाणारे जर कोणी असतील तर ते स्वतः संजय राऊत आहेत.” राऊतांच्या 2029 च्या कोकणातील भविष्यवाणीस उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले “2024 च्याच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला शिमगा करायला भाग पाडले. तुमच्या गटाला दोन्ही हातांनी बोंबा माराव्या लागल्या आणि जनता तुम्हाला घरी बसवून आली. 2029 ची वाट पाहू नका, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतच मुंबईकर तुमच्या बडबडीला कंटाळून तुमच्या तोंडाला बुच लावतील.” नारायण राणे यांच्याबाबत राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत नवनाथ बन म्हणाले की, “नारायण राणे हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरताना राऊत यांना थोडी लाज वाटली पाहिजे. नारायण राणे यांच्या कर्तृत्वामुळे शिवसेना उभी राहिली आणि आज तुम्ही अस्तित्वात आहात. त्यांच्यावर टीका करताना दहा वेळा विचार करावा.”

जनतेनं उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवलं; नवनाथ बन यांचा हल्लाबोल Read More »