DNA मराठी

Sandip Mitke

IMG 20240101 WA0003

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News: Dysp संदिप मिटके यांच्या पथकाने मोठी कारवाई करत कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा टाकून तब्बल 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमी धारामार्फत Dysp संदीप मिटके यांना माहिती मिळाली की, कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे.  या माहितीवरून संयुक्त कारवाई करण्याकरिता संदीप मिटके यांनी कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून माहिती दिली.   त्यांनी तहसील कार्यालय  येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत.  तसेच मनोज चंद्रकांत गिरमे (वय 43 रा. खडकी रोड तालुका कोपरगाव) अल्ताफ बाबू शेख ( वय 48 रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक) या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले.  आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन  येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त Read More »

IMG 20231221 WA0005

Sandip Mitke: हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा, 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका

Sandip Mitke : Dysp संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करत शिर्डी येथील द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा टाकून 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक महिला आरोपी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर 2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहिती वरून संदीप मिटके यांनी सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 4 पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे. याच बरोबर एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.  आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या  फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Sandip Mitke: हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा, 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका Read More »