DNA मराठी

Ratan Tata news

रतन टाटांच्या मृत्युपत्रात मोठा खुलासा, ‘या’ व्यक्तीला मिळणार तब्बल 500 कोटी रुपये

Ratan Tata : देशातील सर्वात लोकप्रिय उद्योगपती पैकी एक असणारे रतन टाटा यांचे 4 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या मृत्युपत्राबद्दल बरीच चर्चा होत आहे. तर दुसरीकडे नुकतंच त्यांचे मृत्युपत्र उघडण्यात आहे आहे. ज्यामधे अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहे. होय, रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात अशा व्यक्तीचे नाव देखील समविष्ट आहे. ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे. रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात या व्यक्तीच्या नावावर 500 कोटी रुपयांची मालमत्ता नोंदवली आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात त्यांची 500 कोटी रुपयांची मालमत्ता मोहिनी मोहन दत्ता यांना दिली आहे. मोहिनी मोहन दत्ताबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. मोहिनी मोहन दत्ता ही जमशेदपूर येथील ट्रॅव्हल क्षेत्रातील व्यावसायिक आहे. दत्ता यांचे कुटुंब स्टॅलियन नावाची ट्रॅव्हल एजन्सी चालवत होते. 2013 मध्ये, एजन्सी ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन झाली, त्यानंतर दत्ता कुटुंबाचा स्टॅलियनमध्ये 80% हिस्सा होता. उर्वरित 20% हिस्सा टाटा इंडस्ट्रीजकडे होता. मोहिनी दत्ता टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या संचालक देखील राहिल्या आहेत. मोहिनी मोहन दत्ता रतन टाटांच्या जुन्या सहचाऱ्या होत्या. रतन टाटा यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की दत्ता हे त्यांचे जुने मित्र होते. ते टाटा कुटुंबाशीही जवळचे होते. दत्ताच्या एका मुलीने 2021 पर्यंत 9 वर्षे टाटा ट्रस्टमध्ये काम केले. त्यापूर्वी ती ताज हॉटेल्समध्ये काम करायची. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारात, दत्ता यांनी सांगितले की ते पहिल्यांदा जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये रतन टाटा यांना भेटले. तेव्हा रतन टाटा 24 वर्षांचे होते. दत्ताने दावा केला होता की ते एकमेकांना 60 वर्षांपासून ओळखतात.

रतन टाटांच्या मृत्युपत्रात मोठा खुलासा, ‘या’ व्यक्तीला मिळणार तब्बल 500 कोटी रुपये Read More »

Ratan Tata: असिस्टंट’ म्हणून सुरुवात नंतर कंपनीलाच बनवलं इंटरनॅशनल ब्रँड.., रतन टाटांच्या यशाची कहाणी

Ratan Tata: रतन टाटा उद्योगविश्वातील मोठं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरलीय 1991 ते 2012 या काळात रतन टाटा स्वतः टाटा समुहाचे चेअरमन राहिले. या काळात त्यांनी उद्योग विश्वात अनेक किर्तीमान स्थापन केले. त्यांनी टाटाला इंटरनॅशनल बँड म्हणून विकसित केलं.   देशातील सर्वाधिक लोकप्रिय उद्योजक आणि अब्जाधीश रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 1991 ते 2012 या काळात रतन टाटा हे टाटा ग्रुपचे चेअरमन होते. या काळात त्यांनी उद्योग क्षेत्रात अनेक किर्तीमान स्थापित केले. टाटा समुहाला त्यांनी एक वेगळं स्थान प्राप्त करून दिलं त्याचबरोबर एक उदारवादी माणूस म्हणूनही त्यांनी नाव मिळवलं. हेच कारण आहे की देशातील अगदी लहान व्यापारी असो की मोठा उद्योजक किंवा उद्योग विश्वात दाखल होणारा प्रत्येक जण रतन टाटांना आपला आदर्श मानतो. रतन टाटा सन 1962 मध्ये टाटा इंडस्ट्रीमध्ये सहायक म्हणून सहभागी झाले होते. नंतर त्याच वर्षात टाटा इंजिनीरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीच्या जमशेदपूर युनिटमध्ये सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं. विविध कंपन्यांत काम केल्यानंतर 1971 मध्ये नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रभारी निदेशक म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली. 1981 मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. सन 1991 ते 28 डिसेंबर 2012 रोजी सेवा निवृत्तीपर्यंत रतन टाटा हे टाटा सन्स या कंपनीचे अध्यक्ष होते. या दरम्यान टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल ब्रेवरेज, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेली सर्व्हिसेस सहित अन्य प्रमुख टाटा कंपन्यांचेही अध्यक्ष होते. भारत आणि विदेशात विविध संघटनांशी त्यांचा संबंध होता. रतन टाटा मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेसक्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीत होते.  सर रतन टाटा ट्रस्ट, एलाइड ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि एलाइड ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेटल रिसर्चच्या प्रबंधन परिषदेचे रतन टाटा अध्यक्ष होते. कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि दक्षिण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या बोर्डतही रतन टाटा कार्यरत होते. रतन टाटा यांची कामगिरी 1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष सन 2007 मध्ये कोरस कंपनीची खरेदी केली 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हर कंपनीची खरेदी टाटा स्टील कंपनीचा जगभरात विस्तार केला टाटा मोटर्स या कंपनीला मोठं यश मिळवून दिलं टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस कंपनीचा जगभरात विस्तार जागतिक ब्रँड व्हॅल्यू म्हणून टाटा ग्रुपला नवी ओळख मिळवून दिली रतन टाटा यांना मिळालेले पुरस्कार सन 2000 मध्ये पद्म भूषण पुरस्कार 2008 मध्ये पद्म विभूषण पुरस्कार सन 2009 मध्ये ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन 2012 मध्ये इंटरनॅशनल हेरिटेज फाऊंडेशनचा लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार टाटांचे सामाजिक कार्य  रतन टाटा यांना परोपकार आणि सामाजिक कार्यासाठी देखील ओळखले जाते. रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा ट्रस्ट आणि टाटा फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. शिक्षण   शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा पाया आहे असे रतन टाटा म्हणत होते. त्यामुळे त्यांनी देशभरात शाळा आणि महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच त्यांनी अनेक स्कॉलरशिप योजनांची सुरुवात केली. आज याच स्कॉलरशिपचा लाखो विद्यार्थी लाभ घेत आहेत. आरोग्य   टाटा ट्रस्टने अनेक आरोग्य सेवा आणि रुग्णालयांत गुंतवणूक केली आहे. कॅन्सर रिसर्च, एड्सवरील उपचार आणि देशातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी विशेष कार्य केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) आणि भारतीय विज्ञान संस्थान (IISc) यांसारख्या प्रमुख शिक्षण संस्थांना पाठबळ दिलं. रतन टाटा त्यांच्यातील परोपकाराच्या गुणामुळे सुद्धा ओळखले जातात. रतन टाटांच्या नेतृत्वात टाटा समूहाने भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठात 28 मिलियन डॉलरचे टाटा स्कॉलरशिप फंड स्थापन केला. सन 2010 मध्ये टाटा समूहाने हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक कार्यकारी केंद्र स्थापन करण्यासाठी 50 मिलियन डॉलर दान केले होते. या केंद्राला टाटा हॉल असे नाव देण्यात आले. सन 2014 मध्ये टाटा समूहाने आयआयटी – बॉम्बेला 95 कोटी रुपये दान दिले होते. तसेच टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईन संस्थेची स्थापना केली होती. 

Ratan Tata: असिस्टंट’ म्हणून सुरुवात नंतर कंपनीलाच बनवलं इंटरनॅशनल ब्रँड.., रतन टाटांच्या यशाची कहाणी Read More »

Ratan Tata:  उद्योगपती रतन टाटा यांचं निधन, ICU मध्ये सुरु होता उपचार

Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांचा निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.  सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वयाशी संबंधित आजारांमुळे माझी सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मी बरोबर आहे. अशी माहिती एक्सवर रतन टाटा यांनी दिली होती.  रतन टाटा यांनी मार्च 1991 ते डिसेंबर 2012 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा प्रथम टाटा ग्रुपची कंपनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्यानंतर जमशेदपूर येथील टाटाच्या प्लांटमध्ये काही महिने प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या हाताळण्यास सुरुवात केली. 2008 मध्ये, रतन टाटा यांना भारत सरकारने देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. टाटाच्या दूरदृष्टी आणि धोरणात्मक विचारातून ग्रुपने दूरसंचार, रिटेल आणि ऑटो यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हरची खरेदी ही टाटाच्या सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक होती, जो टाटा ग्रुपच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण होता.

Ratan Tata:  उद्योगपती रतन टाटा यांचं निधन, ICU मध्ये सुरु होता उपचार Read More »