Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंद नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचरा गाडी बंद असल्याने घाणीचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा आहे आणि कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  पावसाळा सुरू झाला असून अहमदनगर शहरात मागच्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा आगमन झालं आहे.  कचरा गाडी बंद असल्याने परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ठेकेदार देखील लक्ष देत नाही आहे.  तर दुसरीकडे 17 जूनला बकरा ईद असल्याने महापालिका आणि ठेकेदारने लक्ष घालून परिसरात जमा झालेल्या कचऱ्याचे ढीग उचलावे अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे तसेच पुन्हा एकदा लवकरात लवकर परिसरात कचरा गाडी सुरू करावे असे देखील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष Read More »