DNA मराठी

Monika rajale

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे 

Monika Rajale : ताजनापुर योजनेवर चर्चा सुरु केली की समजून जायचे निवडणूक आली आहे. निवडणूक प्रचारात गावासाठी काय दिले, काय करणार हे न सांगता, जातीपातीचे राजकारण सुरु करायचे. त्यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने, विकासाच्या मुद्द्याला बगल द्यायची, दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा, जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरले असते तर विकास कामे दिसली असती. तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.    आमदार राजळे यांनी तालुक्यातील ठाकूर निमगाव, कुरुडगाव रावतळे, वरुर, भगुर, आव्हाणे, दिंडेवाडी, बऱ्हाणपुर, मळेगाव, भातकुडगाव, आखतवाडे, आपेगाव, गरडवाडी, ढोर जळगाव, सामानगाव, लोळेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला. वरुर येथे झालेल्या कार्यक्रमात दिनकर अंचवले महाराज, भिमराव फुंदे, सचिन म्हस्के, भानुदास सोनटक्के, मारुती लव्हाट, विठ्ठल झिरपे, केशव म्हस्के, गणपत शिंदे, संजय देवडकर, संजय मोरे, बाबासाहेब धायतडक, प्रकाश म्हस्के, भागवत झिरपे, भाऊसाहेब वावरे, किसन म्हस्के, संजय मोरे, दीपक भुसारी, बापुनाना पिसोटे, रवींद्र वायकर, आशाताई गरड, मारुती खांबट, गणेश म्हस्के, अंबिका लव्हाट, अजिंक्य लव्हाट, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना राजळे म्हणाल्या, कारखान्याला मदत हवी होती, त्यावेळी अजितदादांच्या गटात आले. दिडशे कोटी रुपये निधी मिळाला, लगेच पलटी मारली. त्यांनी देखील यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले, त्यांच्या कार्यकाळात बसस्थानक, शहर पाणी योजना, ताजनापुर योजना, रस्ते, आदी प्रश्न होते. इतक्या वर्षापासून महिलांचे पाण्यासाठीचे सुरु असलेले हाल त्यांना दिसले नाहीत. मी महिला असल्याने त्यांचे दुःख वेदना मला जाणवल्या त्यामुळे प्राधान्याने पाणी प्रश्नावर पाठपुरावा करुन पाणी प्रश्न मार्गी लावला. बसस्थानक, विविध रस्त्यांचे कामे मार्गी लावली. त्यावेळी त्यांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणीही अडवले नव्हते. प्रत्येक गावात किमान एक कोटी निधी देऊन विविध प्रश्न मार्गी लावले. क्वचित एखाद्या गावाला कोटी पेक्षा कमी निधी मिळाला असेल. पण भेदभाव न करता जनतेचे हित लक्षात घेऊन कामे केल्याचे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे  Read More »

Maharashtra Election: आमदार राजळे यांना उमेदवारी जाहीर पण अडचणी वाढणार, अपक्ष म्हणून दौंड विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

Maharashtra Election: राज्यात विधानसभेचे बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आता उमेदवार घोषणा करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. नुकतंच भाजपकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने पुन्हा एकदा शेवंगाव-पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना संधी दिली आहे. पक्षाने सलग तिसऱ्यांदा आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र दुसरीकडे या मतदारसंघातून आता गोकुळ दौंड अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदा आमदार मोनिका राजळे यांना निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा नगरच्या राजकारणात वर्तवण्यात येत आहे. शेवंगाव-पाथर्डी मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून काही विशिष्ट घराण्याची मक्तेदारी सत्तास्थानात असल्याचा आरोप पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड यांनी केला आहे. काही दिवसापूर्वी दौंड तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवंगाव आणि पाथर्डीत घेतलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून गोकुळ दौंड यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असे अश्वाशीत केले आहे. या अनुषंगाने दौंड यांनी भाजपच्या राज्यातील शीर्ष नेतृत्वाकडे पक्षाकडून उमेदवारी मागितलेली होती. आ. मोनिक राजळे या 2014 आणि 2019 ला सलगपणे निवडून आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे रखडल्याचा विरोधकांचा आरोप असून जनतेत असलेल्या नाराजीचा फटका त्यांना यंदा बसू शकतो अशी चर्चा केवळ नागरिकांतच नव्हे तर भाजप कार्यकर्त्यां अंतर्गत सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदारसंघात दौंड यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी होत असतानाच दौंड यांनीही आता कोणत्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धारच केला आहे. मतदार संघ समस्यांनी ग्रासलाशेतकऱ्यांचे पाटपाण्याचे प्रश्न, विविध गावांच्या पाणी योजना, युवा वर्गाला एमआयडीसी अभावी रोजगाराचा अभाव, खराब रस्ते, विद्युत पुरवठ्यात सातत्याने अडचणी यामुळे जनता मेटाकुटीला आली असून जनतेला आता बदल हवा असून याच मुद्द्यावर आपण लक्ष केंद्रीत करत असल्याचे देखील दौंड म्हणाले.

Maharashtra Election: आमदार राजळे यांना उमेदवारी जाहीर पण अडचणी वाढणार, अपक्ष म्हणून दौंड विधानसभेच्या रिंगणात उतरणार? Read More »

Maharashtra Election: आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर होताच बालमटाकळीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…..!

Maharashtra Election:– भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून रविवार दि. 20 रोजी महाराष्ट्रातील 2024 साठी विधानसभेच्या 99 जागांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे आमदार मोनिका राजळे यांना पक्षाने तीसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करताच शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील भारतीय जनता पार्टीचे समर्थक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष कासमभाई शेख, माजी सरपंच अशोकराव खिळे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब जिजा वाघुंबरे, नशीरभाई शेख, आफसर शेख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर होताच बालमटाकळीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…..! Read More »