DNA मराठी

MiM

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट

Maharashtra Assembly Session: राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात विरोधक वाढत्या महागाईवरून, राज्यातील कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि इतर मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हे आहे.

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट Read More »

AIMIM : दंगल घडवण्याचे उद्देशाने काही दंगलखोर संघटन जिल्ह्यात सक्रिय – डॉ परवेज अशरफी

AIMIM : काही दिवसापूर्वी नगर महानगरपालिका हद्दीतील गंगा उद्यान येथे काही बुरखाधारी व्यक्तींनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच काही जातीवादी संघटना आणि नगरचे लोकप्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी आंदोलन करून हनुमान चालीसा व हवन आणि वराह पूजा करून शुद्धीकरण केले. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित होत असल्याचे निदर्शनास आले. परंतु तो व्हिडिओ व्यवस्थित पाहिलं तर त्यात काही टेक्निकल बाबी आढळून आले आहे. सदर बुरखाधारी नमाज पठण ज्या दिशेने करत आहे त्या दिशेने भारतीय मुस्लीम नमाज पठण करत नाही. त्यामुळे भारतात राहणाऱ्या मुस्लिम समाज हा काबा च्या दिशेने म्हणजेच सूर्य अस्त च्या दिशेने नमाज पठण करतो. परंतु सदर बुरखाधारी हे नमाज पठण काबा च्या दिशेने न करता उत्तरेचे दिशेने करत असल्याचे दिसते याच्याच अर्थ सदर बुरखाधारी हे मुस्लिम समाजाचे किंवा इस्लाम धर्माला मानणारे नसावेत. तसेच नमाज पठण करण्याच्या अगोदर वजू करणे म्हणजे योग्यरित हातपाय धुणे अनिवार्य आहे. परंतु गंगा उद्यान मध्ये अशी कोणती सोय नसल्याने त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे महिला नमाज पठण करणे टाळतील. गंगा उद्यानात वेगवेगळ्या ४ पायाचे जनावर त्या ठिकाणी आढळून येतात आणि घाण करून जातात अशा ठिकाणी मुस्लिम समाजाचे व्यक्तीने नमाज पठण करणे हे शक्य नसल्याने शंका निर्माण होणे साहजिक आहे. भारतामध्ये असे अनेक प्रकार रोज घडत आहे की काही पुरुष बुरखा घालून मंदिराच्या समोर अनावश्यक वातावरण खराब करणाऱ्या गोष्टी करतात आणि पळून जातात यातले काही पकडले गेल्याने लोकांचे लक्षात आले की बुर्खायाचे आत मध्ये महिला नसून पुरुष आहे आणि तेही मुस्लिम समाजाचा नसून इतर समाजाचे आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच काही जातीवादी संघटना इतके तातडीने उद्यानात आले जसेकाय ते या व्हिडिओची प्रतीक्षा करत होते. येतांना त्यांनी सर्व समग्री सोबत आणली आणि हवन, भजन कीर्तन हनुमान चालीसा आणि वराह पूजा हे सर्व केले. नगरचा लोकप्रतिनिधी आणि जातीवादी संघटना या उद्यानात हजर झाले यावरून असे दिसते की व्हिडिओ काढणे आणि ते त्यांच्या ग्रुप वर टाकणे आणि लगेच संबंधित टोळी हे उद्यानात येऊन धिंगाणा घालणे हे सर्व पूर्ण नियोजित आणि योग्य रीतीने षडयंत्र भाग असल्याचे दिसते. डॉ परवेज अशरफी यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले की जर नमाज पठण सार्वजनिक ठिकाणी केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर त्याच ठिकाणी हनुमान चालीसा, हवन वराह पूजा होत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही ? निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की संबंधित बुरखाधारी महिला व पुरुष प्रशासनाने शोधावे व तातडीने अटक करावी. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने व्हिडिओ काढून व्हायरल केला त्यालाही अटक करून त्याच्याकडून माहिती उपलब्ध करून घ्यावे जेणेकरून हा सर्व षडयंत्र जनतेसमोर येईल. ईदच्या दिवशी माळीवाडा भागात जे घडले त्यात एक बुरखाधारी आढळले परंतु ती महिला की पुरुष हे अद्याप समजले नाही परंतु त्यातही काही त्रुटी असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले आहे. प्रशासनाने त्याचा योग्य छडा लावल्यास त्या ठिकाणी तो प्रकार एक षड्यंत्र असल्याचे जनते समोर येईल. गंगा उद्यान या प्रकरणाचा योग्य रीतीने तपास करून दोषींवर कारवाई झाली नाही तर या षडयंत्र करणाऱ्या टोळीची हिम्मत वाढेल आणि भविष्यात असे प्रकार सर्रास घडताना आपल्याला दिसेल. याचा नुकसान भारतीय मुस्लिमांना भोगावे लागेल. पोलिस प्रशासनाने या दोन्ही घटनेची योग्य रीतीने तपास केल्यास नक्की अहमदनगर मध्ये चालले षडयंत्र जनतेसमोर येईल अशी खात्री एम आय एम चे जिल्हाध्यक्ष डॉ परवेझ अशरफी यांनी नगरच्या पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

AIMIM : दंगल घडवण्याचे उद्देशाने काही दंगलखोर संघटन जिल्ह्यात सक्रिय – डॉ परवेज अशरफी Read More »

Rais Shaikh : अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; सुनेत्रा पवारांना पत्र

Rais Shaikh : राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त असून त्याचा या विभागाच्या योजना राबवण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, मार्टी संस्थेच्या कामास गती द्यावी, भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव मार्गी लावावा आदी १२ मागण्या समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्या आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी १९७८ क्रमांकांच्या लक्षवेधी सूचनेच्या कार्यवाहीबाबत सोमवारी मुस्लीम आमदारांची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुस्लीम आमदारांची बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, या विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त आहेत. तसेच अल्पसंख्याक आयुक्तालयातील ३६ आणि जिल्हा कार्यालयातील ८५ नवी पदे अद्याप भरलेली नाहीत. अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे कामकाज अद्याप सुरळीत झालेले नाही. भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव सादर केला आहे, मात्र काम प्रत्यक्ष सुरु नाही. तसेच लोकराज्य मासिकाची उर्दू आवृत्ती तातडीने सुरु करण्याची गरज आहे. आमदार रईस शेख पुढे म्हणाले की, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाच्या अटी शिथील करण्याची मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. उर्दू साहित्य अकादमीच्या अधिक्षक व कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार दिलेले नसून या कार्यालयाच्या नूतनीकरणाची बाब प्रलंबित आहे. टाटा समाज विज्ञान संस्थेला मुस्लिमांच्या सामाजिक -आर्थिक सर्वेक्षण करण्याच्या दिलेल्या कामाचा चार वर्षे कार्यारंभ दिलेला नाही. या सर्व प्रलंबित बाबी मुस्लीम समाजाच्या विकासासाशी संबंधित असून त्या तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे आमदार रईस शेख म्हणाले. १ जून रोजी आमदार शेख यांचा वाढदिवस असल्याने पूर्वनियोजित कार्याक्रमामुळे आपण या बैठकीस हजर राहू शकत नाही. दिवगंत अजित पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाला न्याय देण्याचा कायम प्रयत्न केला. त्यांची अपुरी राहिलेली या विभागाची कामे आपण मार्गी लावावीत, अशी विनंती आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली आहे.

Rais Shaikh : अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; सुनेत्रा पवारांना पत्र Read More »

jaykumar gore on praniti shinde

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार?

Jaykumar Gore on Praniti Shinde : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल ‘बालाजी सरोवर’ येथे खासदार प्रणिती शिंदेंबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. प्रणिती शिंदें यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या शेवटी हिंदीतून “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं, पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा शेलक्या आणि आक्षेपार्ह शब्दांत प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार” असा नारा दिला. यानंतर त्यांनी खासदार प्रणिती शिंदेंच्या भावनिक पत्रावर वादग्रस्त टिप्पणी केली. “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून विरोधी पक्ष म्हणून एमआयएम भूमिका बजावणार आहे.

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार? Read More »

asaduddin owaisi

Asaduddin Owaisi: MIM ठरवणार नगरचा महापौर; असदुद्दीन ओवैसी विरोधकांवर भडकले

Asaduddin Owaisi : अहिल्यानगर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना नगरचा महापौर आम्ही ठरावावर असा दावा एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केल्याने शहरातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त आणि जर त्यांनी पैसे वाटले तर पैसे घ्या आणि त्या पैशातून त्यांच्याच नावाने शौचालय बांधा असा टोला देखील लावला आहे. बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या. तिथे महिलांनी एकत्र येऊन एमआयएमला मतदान केलं. पुरुषांनी मतदान दिलं नाही तरी त्यांच्या घरातील महिलाच एमआयएमला मत देणार. एमआयएमला इथवर पोहोचवण्यात महिलांचा वाटा सर्वात मोठा आहे असं देखील या सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले. महापौर नगरचा MIM च ठरवेल जर तुम्ही आमचे सहा उमेदवार जिंकून दिले तर आम्ही नगरचा महापौर ठरवणार असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तसेच या निवडणुकीत मला पूर्ण विश्वास आहे हे जालीम हरतील. घरातील महिलांनी आम्हाला लढायला शिकवलं,असं सांगत त्यांनी मतदारांना निर्भय मतदानाचं आवाहन केलं. विरोधक पैशाच्या जोरावर लढत आहेत पैसे न पाहता विकास पाहा. 15 तारखेला न घाबरता मतदान करा असा स्पष्ट संदेश दिला.

Asaduddin Owaisi: MIM ठरवणार नगरचा महापौर; असदुद्दीन ओवैसी विरोधकांवर भडकले Read More »

imtiaz jaleel

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा

BJP MIM Alliance: राज्यातील राजकारणात चर्चेत आलेल्या अकोट नगरपालिकेत आज मोठी राजकीय घडामोडी घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष अकोटकडे लागले आहे. अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने शहरातील विकासासाठी अकोट विकास आघाडीची स्थापना करत भाजपने एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह युती केली आहे. भाजपने थेट एमआयएमशी युती केल्याने विरोधक भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर युती झाली असून स्थानिक पातळीवर ज्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपसोबत युती मान्य नसून युती तोडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अकोटमध्ये भाजपशी युती होणार नाही. युती तोडण्याचे आदेश दिले आहे. असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असेही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र

Maharashtra Politics : एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 29 महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे नुकतंच अकोट पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. अकोट येथे नुकतंच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकले होते मात्र बहुमतपासून पक्ष दूर होता. तर आता अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पुढाकाराने एक आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीमध्ये एमआयएमला देखील स्थान देण्यात आल्याने विरोधकांकडून आता भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने या आघाडीत एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्थान दिले आहे. तर वंचित आणि काँग्रेसला या आघाडीपासून दूर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे आता या आघाडीवर एमआयएम आणि भाजपच्या वरिष्ठांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अकोट नगरपालिका एकूण जागा : 35 निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार) पक्षीय बलाबल : भाजप : 11 काँग्रेस : 6 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 वंचित : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3 एमआयएम : 5 भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या ‘अकोट विकास मंचा’चे पक्षीय बलाबल : भाजप : 11 एमआयएम : 5 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र Read More »

asaduddin owais

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का

Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून पुन्हा एकदा एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहे. या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपने शानदार कामगिरी करत काँग्रेस आणि आरजेडीला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सीमांचलमध्ये ओवैसी फॅक्टर पुन्हा एकदा दिसून आला आहे. 2020 मध्ये सीमांचलमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने 5 जागांवर बाजी मारली होती. तर आता या निवडणुकीत पुन्हा एकदा एमआयएमने 5 जागा जिंकले असून एका जागेवर सध्या आघाडी घेतली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एमआयएमकडून आरजेडीकडे 6 जागांची मागणी करण्यात आली होती मात्र आरजेडी एमआयएमला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर एमआयएमकडून 24 जागांवर उमेदवार देण्यात आले होते तर या 24 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे तर एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने या निवडणुकी 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाला काही खास करता आले नाही. काँग्रेस ताज्या अपडेटनुसार 5 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे फक्त सीमांचलमधेच नाहीतर संपूर्ण बिहारमध्ये आरजेडीला मोठा फटका बसला आहे.

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले

Asaduddin Owais: अहिल्यानगर शहरात एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेपूर्वी पोलिसांनी खासदार ओवैसी यांना सभेसाठी काही अटी आणि शर्ती घातल्याने सभेत बोलताना ओवैसी यांनी फक्त मलाच लव्ह लेटर का? असा प्रश्न विचारत पोलिसांचा भरपूर समाचार घेतला. या सभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता येतो, जेव्हा ठाकरे गटाचा नेता येतो, जेव्हा आरएसएसची सभा असते आणि जेव्हा भाजपचा नेता येतो तेव्हा पोलीस त्यांना लव्ह लेटर देत नाही. फक्त आम्हालाच लव्ह लेटर मिळतो कारण पोलिसांना देखील माहिती मर्द फक्त एकच आहे. अश्या शब्दात खासदार ओवैसी यांनी पोलिसांचा समाचार घेतला. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मी भारताचा नेतृत्व दुसऱ्या देशामध्ये केलं. कतरचे एक शेख पॅलेस्टाईन संबंधी भारताविषयी बोलत होते तेव्हा माझ्या डेलिगेशनने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्या शेख ला उत्तर दिलं की भारतापेक्षा तर तुमचा हा कतर पॅलेस्टाईनच्या अगदी जवळ आहे मग तुम्ही का नाही पहिले मदत पोहोचवत आणि भारत याने आपला एक हिस्सा हा पॅलेस्टाईन साठी ठेवलेला आहे. असं मी कतर मध्ये भारताची साईट घेऊन सांगितलं आज मी भारतासाठी दुसऱ्या देशांशी लढत आहे तरी देखील जिथे मी जातो तिथे मला लव्ह लेटर दिला जातो आणि त्यात सांगितलं जातं की मी काय बोलावं आणि काय नाही ? बीजेपी पार्टीचे नेते येतात, शिंदे पार्टीचे नेते येतात, अजित पवार पार्टीचे नेते येतात तेव्हा त्यांना का हा लव्हलेटर दिला जात नाही. मी एकटाच मर्द पोलिसांना दिसतो का? आणि ज्या कलमान्वये मला हा लेटर देण्यात आला तो कलमला रद्द करण्यासाठी मीच 35 मिनिट सादनात भाषण केलं आहे. कदाचित पोलीस हे विसरले. पोलिसांनी दिलेला हा लव्ह लेटर मी रिजेक्ट करतो असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले Read More »

imtiaz jaleel

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap : अहिल्यानगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगर शहरात चिकनी चमेली राहत असून काम न करता फक्त हिंदू मुस्लिम करत असल्याची टीका त्यांनी नाव न घेता आमदार जगताप यांच्यावर केली आहे. या सभेत बोलताना आम्ही पंतप्रधान मोदींना उत्तर देतो तर तू कोण? तू तर चिल्लर आहे असा टोला देखील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांना लावला. तर दुसरीकडे त्यांनी नगर – औरंगाबाद रस्त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान करत मी 20 हजार रुपये देतो तुम्ही एकदा नगर – औरंगाबाद रस्त्यावर प्रवास करा असं म्हटले आहे. तसेच आमच्या पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो मात्र मी जेव्हा आमदार आणि नंतर खासदार झालो तेव्हा मी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता अशी आठवण देखील जलील यांनी विरोधकांना करून दिली. तर दुसरीकडे नगर शहरात एक विषारी साप असून तो दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या विष मध्ये दम नाही अशी टीका फारुख शाब्दी यांनी आमदार जगताप यांच्यावर केली.

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर Read More »