Ambernath Crime: धक्कादायक, अंबरनाथच्या जावसई भागात तरुणावर तलवार-कोयत्यांनी जीवघेणा हल्ला
Ambernath Crime: अंबरनाथ जावसई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीने तलवार-कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलेनगर वाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्यांचा तबेलाही आहे. गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला […]
