DNA मराठी

IND vs ENG

rishabh pant

भारताला मोठा धक्का! Rishabh Pant पाचव्या कसोटीतून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

IND vs ENG: मँचेस्टर कसोटीमध्ये शानदार कामगिरी करत इंग्लंडला भारतीय संघाने मोठा धक्का दिला आहे. तर आता भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत खेळणार नाही. तो दुखापतीमुळे 31 जुलैपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत सहभागी होऊ शकणार नाही. मँचेस्टर कसोटीदरम्यान फलंदाजी करताना पंतला गंभीर दुखापत झाली. त्याच्या जागी निवडकर्त्यांनी अनकॅप्ड यष्टीरक्षक एन जगदीसनला संघात समाविष्ट केले आहे. भारत सध्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे, परंतु पाचवी कसोटी जिंकून मालिका अनिर्णित राहण्याची आशा अजूनही आहे. रिव्हर्स स्वीप खेळताना दुखापत बीसीसीआयच्या मते, मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत असताना ऋषभ पंतला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सचा चेंडू उजव्या पायावर लागला. चेंडू लागताच त्याला खूप वेदना होत असल्याचे दिसून आले आणि त्याला मैदान सोडावे लागले. तथापि, धाडस दाखवत पंत दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आला आणि त्याने शानदार अर्धशतकही ठोकले. बीसीसीआयने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, “मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे ऋषभ पंतला मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर काढण्यात आले आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवेल आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देईल.” एन जगदीसनला कसोटी संघात स्थान ऋषभ पंतच्या बाहेर पडण्यामुळे संघात एक रिक्त जागा निर्माण झाली होती, जी भरण्यासाठी निवडकर्त्यांनी तामिळनाडूचा प्रतिभावान यष्टीरक्षक-फलंदाज नारायण जगदीसनला संधी दिली आहे. तो अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकलेला नाही, परंतु देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला ही संधी देण्यात आली आहे. पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण, आकाश दीप, आकाश दीप, अरविंद, अरविंद, एन. जगदीसन (यष्टीरक्षक).

भारताला मोठा धक्का! Rishabh Pant पाचव्या कसोटीतून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळणार संधी Read More »

aus vs wi

ऑस्ट्रेलियाचा कहर, वेस्ट इंडिज फक्त 27 धावांवर ऑल आऊट; स्टार्क ठरला हिरो

Aus Vs WI : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजचा दुसरा डाव फक्त 27 धावांवर रोखला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ फक्त 27 धावांवर सर्वबाद झाला. कसोटी क्रिकेटमधील हा दुसरा सर्वात कमी धावसंख्या आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य होते. परंतु वेस्ट इंडिज संघ फक्त 27 धावांवर गारद झाले. कसोटी क्रिकेटमधील हा 70 वर्षातील सर्वात कमी धावसंख्या आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यातील हा सर्वात कमी धावसंख्या आहे. या सामन्यात एकूण सात फलंदाज शून्यावर बाद झाले. 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या मिचेल स्टार्कने कहर केला. दुसऱ्या डावात पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने तीन विकेट घेतले. तर या डावात सहा विकेट घेतले. तर स्कॉट बोलँडने हॅटट्रिक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी स्कोअर 26 – न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, ऑकलंड – 1955 27 – वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, किंग्स्टन, 2025 30 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, ग्वेबेर्हा, 1986 30 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, 1924 यासह स्टार्कने त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यात 400 बळी पूर्ण केले आणि बोलँड कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा 10 वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलियाचा कहर, वेस्ट इंडिज फक्त 27 धावांवर ऑल आऊट; स्टार्क ठरला हिरो Read More »

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या

Cricket New Rules: सीमारेषेवरील ‘बनी हॉप्स’ झेलबाबत एमसीसीने नवीन नियम केले आहेत.  हा नवीन नियम नेमका आहे तरी काय, हे जाणून घ्या. नवीन नियम काय? कायदा 19.5.2 चे बदल करण्यात येणार आहे.नवीन नियमानुसार असा झेल क्षेत्ररक्षकाने घेतला, तर त्या फलंदाजाला नाबाद ठरविले जाईल. नवीन नियमानुसार झेलसाठी सीमारेषेबाहेर गेलेल्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हवेत असताना चेंडूला फक्त एकदाच स्पर्श करण्याची परवानगी असणार आहे. हा नियम रिले (दोन क्षेत्ररक्षकांनी मिळून घेतलेल्या) झेललाही लागू होईल. 17 जूनपासून लागू होणार नवीन नियम हा नियम 17 जून 2025 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू होईल आणि ऑक्टोबर 2026 पासून अधिकृतपणे एमसीसीच्या कायद्यांमध्ये समाविष्ट केला जाईल. बनी हॉप्स म्हणजे काय? सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक झेल टिपतो आणि त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेबाहेर जात असेल, असे त्याला वाटते, तेव्हा तो चेंडू हवेत उडवितो. पुन्हा उंच उडी मारून (जमिनीला पायाचा स्पर्श होऊ न देता) तो झेल टिपतो आणि पुन्हा चेंडू सीमारेषेबाहेर फेकून पुन्हा झेल टिपतो. या वेगळ्या झेलने ‘बनी हॉप्स’ असे म्हटले जाते.

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या Read More »

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय?

Virat Kohli: काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. माहितीनुसार, विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्याने याबाबत बीसीसीआयला देखील माहिती दिली आहे. भारताचा इंग्लड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोहलीने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयला त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि आता इंग्लंड दौऱ्यात खेळण्याची त्याची शक्यता खूप कमी आहे. कोहलीच्या या निर्णयावरून बीसीसीआयमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या विषयावर विराट कोहलीशी बोलले आहे आणि त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र कोहलीने आपले हेतू स्पष्ट केले आहेत आणि इंग्लंड दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्तीची बातमी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. यापूर्वी, दोन्ही दिग्गज फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, जी भारताच्या विश्वचषक विजयानंतर झाली. जर कोहलीनेही कसोटीतून निवृत्ती घेतली तर भारतीय कसोटी संघाला फलंदाजीच्या क्रमात अनुभवाची मोठी कमतरता भासेल. त्यामुळे यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि शुभमन गिल सारख्या तरुण खेळाडूंवर मोठी जबाबदारी येईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली अपयशी ठरला 2024-25 च्या कसोटी मालिकेत कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत त्याने फक्त 190 धावा केल्या. पर्थ कसोटीत शानदार शतक केल्यानंतर, उर्वरित चार सामन्यांमध्ये तो फक्त 85 धावा करू शकला. हा दौरा त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. कोहलीची कसोटी कारकीर्द विराट कोहलीने आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण 9,230 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 30 शतके आहेत.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय? Read More »

Concussion Substitute Controversy : टीम इंडियाने चीटिंग केली? हर्षित राणाला कन्कशन सबस्टिट्यूट बनवल्याबद्दल वाद चिघळला

Concussion Substitute Controversy: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 15 धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 19.4 षटकांत 166 धावांवर आटोपला. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक 3 बळी घेणाऱ्या हर्षित राणाने, जो कन्कशन पर्याय म्हणून आला होता, तो बाद झाला. त्याने मधल्या षटकांमध्ये आपल्या शानदार गोलंदाजीने सामना बदलून टाकला. पण आता त्याला कन्कशन सबस्टिट्यूट बनवल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत जेव्हा इंग्लंडच्या कर्णधाराला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा बटलरने ही लाईक टू लाईक रिप्लेसमेंट नव्हती. असं उत्तर दिले. आम्ही याच्याशी सहमत नाही. असं देखील बटलर म्हणाला. पुढे बोलताना तो म्हणाला की, शिवम दुबेचा चेंडूचा वेग ताशी 25 मैलांनी वाढला आहे किंवा हर्षित राणाने त्याची फलंदाजी खूप सुधारली आहे. शेवटी बटलर म्हणाला, हे सगळं सामन्याचाच एक भाग आहे. शेवटी आपण सामना जिंकायला हवा होता, जे होऊ शकले नाही. भारताकडून शिवम दुबेने 34 चेंडूत 53 धावांची महत्त्वाची खेळी केली आणि संघाला 181 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजी करताना, 20 व्या षटकातील पाचवा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. कन्कशन टेस्ट न घेता, तो सामन्याचा शेवटचा चेंडू खेळला आणि धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तो मैदानावर आलाच नाही. त्याच्या जागी राणाने क्षेत्ररक्षण केले आणि नंतर गोलंदाजी करून सामना बदलला. त्याने 4 षटकांत 33 धावा देत 3 बळी घेतले. राणाने लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन यांच्या विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणले. आंतरराष्ट्रीय टी20 इतिहासात हर्षित राणा हा कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून पदार्पण करणारा पहिला खेळाडू ठरला. सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर राणा म्हणाला की, इंग्लंडच्या डावाच्या दुसऱ्या षटकात गौतम गंभीरने त्याला सांगितले होते की तो कन्कशन पर्याय म्हणून मैदानात उतरणार आहे. तथापि, 11 व्या षटकानंतर याची अधिकृत पुष्टी झाली आणि हर्षित गोलंदाजी करायला आला आणि दुसऱ्याच चेंडूवर लिव्हिंगस्टोनला बाद केले. यानंतर, सामन्यादरम्यान या मुद्द्यावर सतत चर्चा होत राहिली.

Concussion Substitute Controversy : टीम इंडियाने चीटिंग केली? हर्षित राणाला कन्कशन सबस्टिट्यूट बनवल्याबद्दल वाद चिघळला Read More »

Dhruv Jurel :  ध्रुव जुरेल चमकला, थेट महेंद्रसिंग धोनीच्या यादीत स्थान मात्र …….

Dhruv Jurel : भारतीय संघाने रांची कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला आहे. या सामन्यात भारताला आणखी एक स्टार खेळाडू मिळाला आहे. होय, आपल्या पदार्पणापासूनच यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल सोशल मीडियावर चर्चेत आहे.   रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याला शतक झळकावण्याची संधी होती मात्र तो 90 धावांवर बाद झाला. यामुळे त्याने आता असा विक्रम केला आहे जो त्याला  लक्षात ठेवायला आवडणार नाही.  रांची कसोटीमध्ये भारतीय संघाने पहिल्या डावात 307 धावा केल्या होत्या. या डावात 171 धावांच्या स्कोअरवर भारताने 7 विकेट गमावल्या होत्या पण ध्रुव जुरेलने चमकदार कामगिरी करत  इंग्लंडच्या मोठ्या आघाडीच्या आशा संपुष्टात आणल्या. ध्रुव जुरेलमुळे इंग्लंडला फक्त 46 धावांची आघाडी घेता आली.  महेंद्रसिंग धोनीच्या यादीत ध्रुवचा समावेश  2012 मध्ये नागपूर कसोटीत महेंद्रसिंग धोनी 99 धावा करून धावबाद झाला होता. तर 2007 मध्ये ओव्हल कसोटीमध्ये तो 92 धावावर बाद झाला होता. तर आता रांची कसोटीमध्ये ध्रुव जुरेल देखील 90 धावांवर बाद झाला आहे.  रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लडचा 5 विकेटने पराभव करत पाच सामन्याच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं आहे.  रांची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकामुळे संघाने पहिल्या डावात 353 धावा केल्या. भारत पहिल्या डावात अडचणीत सापडला होता आणि संघाने 177 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या पण येथे कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांच्या भागीदारीने भारताला 307 धावांपर्यंत नेले.  दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ अवघ्या 145 धावांवर गारद झाला. आर अश्विनने 5 तर कुलदीपने 4 विकेट घेतल्या आणि भारताचा विजय निश्चित केला.

Dhruv Jurel :  ध्रुव जुरेल चमकला, थेट महेंद्रसिंग धोनीच्या यादीत स्थान मात्र ……. Read More »

Virat Kohli : भारताला धक्का! तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळणार नाही विराट कोहली; ‘हे’ आहे कारण

Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान 5 कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चमकदारी कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यामुळे आताही मालिका 1-1 ने बरोबरीत आहेत. तर दुसरीकडे पुढील तीन सामन्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे, मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.  असे मानले जात आहे की विराट कोहली भारताचे आणखी दोन आगामी सामने गमावू शकतो. यामुळे यजमान संघाच्या अडचणी वाढणार हे नक्की.  कोहली तिसरा आणि चौथा सामनाही खेळणार नाही  कसोटी मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ 15 फेब्रुवारीला तिसरा सामना खेळणार आहे. हा सामना राजकोटच्या मैदानावर खेळला जाईल. हा कसोटी सामना सुरू होण्याआधी टीम इंडियाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत.  म्हणून कोहली खेळू शकणार नाही भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंपैकी एक विराट कोहली आगामी दोन सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही, ज्याचे कारण जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.  बीसीसीआयने ही माहिती दिली. बीसीसीआयने सांगितले होते की, किंग कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर पडला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने खुलासा केला होता की कोहली दुसऱ्यांदा पिता होणार आहे आणि त्यामुळे तो संघासोबत नाही.  सध्या भारतीय संघ स्वतःच्या होस्टिंग अंतर्गत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. आता सगळ्यांचे लक्ष शेवटच्या तीन सामन्यांवर लागले आहे.

Virat Kohli : भारताला धक्का! तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळणार नाही विराट कोहली; ‘हे’ आहे कारण Read More »

IND vs ENG: भारताला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर! ‘हे’ आहे कारण

IND vs ENG: 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड दरम्यान कसोटी मालिका सुरू होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बाहेर पडला आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. हे जाणुन घ्या की, दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. बीसीसीआयने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. मात्र, विराटच्या बाहेर पडल्यानंतर संघाला अनुभवी खेळाडूची गरज भासणार आहे, त्यासाठी संघ लवकरच विराटच्या बदलीची घोषणा करणार आहे. विराट वैयक्तिक कारणांमुळे बाहेर  विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. विराटने बीसीसीआयला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशीही चर्चा केली. यानंतर बीसीसीआयमध्ये त्याच्या निर्णयाचा पूर्ण आदर करण्यात आला आणि बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने या स्टार फलंदाजाला पाठिंबा दिला आहे. बीसीसीआयचे मीडिया आणि चाहत्यांना आवाहन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मीडिया आणि चाहत्यांना विनंती केली आहे की त्यांनी विराट कोहलीच्या वैयक्तिक कारणास्तव गोपनीयतेचा आदर करावा आणि त्याच्या निर्णयावर अंदाज लावणे टाळावे. बीसीसीआयने विराटच्या या निर्णयाशी पूर्णपणे सहमत असल्याचे स्पष्ट केले असून मीडिया आणि चाहत्यांना विनंतीही केली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर विराट कोहली संघात सामील होऊ शकतो. बीसीसीआयने विराट कोहलीच्या बदलीची घोषणा अद्याप केलेली नाही. बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ते लवकरच विराटच्या बदलीची घोषणा करतील. विराटच्या जागी चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे यांची निवड होऊ शकते, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. कारण विराट कोहलीच्या जागी एखाद्या अनुभवी खेळाडूलाच संधी मिळायला हवी, जो विराटसारख्या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडिया रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद कुमार सिराज, मुहम्मद कुमार. , जसप्रीत बुमराह आणि आवेश खान.

IND vs ENG: भारताला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर! ‘हे’ आहे कारण Read More »