DNA मराठी

health tips 2024

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Ice Cream Benefits : राज्यात आता उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे आता राज्यात आंबे, फणसची मागणी वाढली आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही त्याचप्रमाणे कडक उन्हात आईस्क्रिमची चव चाखणं अनेकांना आवडते. अधिक आईस्क्रिम खाल्ल्यास सर्दी, खोकल्याचा त्रास होतो असे सांगत लहान मुलांना आईस्क्रिम खाण्यापासून दूर केले जाते परंतू प्रमाणात आईस्क्रिम खाल्ल्यास आरोग्याला फायदादेखील होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?   आरोग्यदायी आईस्क्रिम    आईस्क्रिम हे आरोग्यदायी असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रिसर्चच्या अहवालानुसार आईस्क्रिममध्ये नाइसिन, थाइमिन आणि व्हिटामिन A,D,B हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रमाणात आईस्क्रिमचे सेवन केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो.   कॅल्शियम  आईस्क्रिममध्ये व्हिटॅमीन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण उत्तमप्रकारे होण्यास मदत होते.  डोळ्यांसाठी फायदेशीर  आईस्क्रिममधील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरते.  उर्जा स्त्रोत  आईस्क्रिममध्ये कार्ब्स, फॅट्स आणि प्रोटीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते.   रक्ताचा प्रवाह सुधारतो   आईस्क्रिममधील व्हिटॅमिन के शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करतो.  मेटॅबॉलिझम   आईस्क्रिममध्ये बी 6 व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.  स्मरणशक्ती तल्लख  आईस्क्रिममध्ये बी 12 व्हिटॅमिन असल्याने स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत होते.  वजन घटवणं   वजन घटवण्यसाठी आईस्क्रिम मदत करते. आईस्क्रिम थंड स्वरूपाचे असते. त्याला सामान्य स्थितीमध्ये आणण्यासाठी शरीराला मेहनत घ्यावी लागते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते.  अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी व्हेनिला आईस्क्रिम मदत करते. व्हेनिला आईस्क्रिम हे कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह न मिसळाता, घरच्या घरी किंवा शुद्ध स्वरूपात बनवलेले असेल तर त्यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे Read More »

Health Tips: झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या, मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे

Health Tips: कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठून कोमट पिण्याचा सल्ला तर आपण अनेकांकडून ऐकला असेलच.  कोमट पाण्यात सर्व शारीरिक कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्याची क्षमता असते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायद्याचे आहे. झोपताना अनेक लोक पाणी पिणे टाळतात परंतू कोमट पाणी पिण्याने आरोग्यही चांगलं राहतं आणि शांत झोप देखील लागते. योग्य रित्या होईल पचन कोमट पाणी पचन तंत्रात अवांछित अन्नाला योग्य पचन दिशेत घेऊन जाण्यात मदत करतं. रात्री आपले पचन तंत्र सर्वात कमजोर अवस्थेत असतं अशात कोमट पाणी पिण्याने अन्न लवकर पचण्यात मदत मिळते. वजन कमी होण्यास मदत मिळेल आमचे पचन तंत्र रात्री मजबूत अवस्थेत नसतं. अशात कोमट पाण्यामुळे आहार लवकर पचवण्यात मदत मिळतं. ज्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. काळजी आणि उदासीनता दूर होईल शरीरात पाण्याची कमी ताण निर्माण होतं. यामुळे झोप देखील प्रभावित होते. दिवसाच्या शेवटी कोमट पाण्याचे सेवन केल्याने शरीरात जल स्तराचे प्रमाण योग्य राहील आणि आपली मन देखील प्रसन्न राहील. विषारी पदार्थांपासून मुक्ती कोमट पाणी शरीराचे आंतरिक तापमान वाढवतं आणि घाम निर्माण करतं ज्यामुळे रक्त परिसंचरण सुरळीत राहतं आणि शरीराला विषाक्त पदार्थांपासून मुक्ती मिळते. सौंदर्यात वाढ झोपण्यापूर्वी कोमट पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते आणि त्वचेचं सौंदर्य वाढतं.

Health Tips: झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या, मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे Read More »

Health Tips: लिंबू-गुळाचा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, पाहता पाहता वजन होईल कमी

Health Tips: आज अनेकजण वजन वाढल्यामुळे त्रस्त आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय देखील करतात मात्र त्यांना काहीच फायदा होत नाही. या लेखात आम्ही तुम्हाला आज लिंबू आणि गुळापासून वजन कमी करण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत.  आम्ही तुम्हाला सांगतो लिंबू आणि गुळापासून बनवलेले पेय तुम्हाला वजन कमी करण्यास तसेच पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतात.  काही अतिरिक्त किलो वजन वाढवणे सोपे आहे मात्र तितकेच वजन कमी करणे कठीण आहे. अनेकांचे सध्याच्या काळात चांगलेच वजन वाढले आहे. खासकरून अनेकांची पोटाची चरबी वाढली आहे. दरम्यान, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य डाएट आणि नियमित एक्सरसाईज करणे गरजेचे असते.  मात्र बऱ्याचदा काही सोप्या टिप्सही तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात.  या लेखात तुम्हाला आम्ही साध्या गूळ-लिंबाच्या काढ्याबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी कऱण्यास मदत होईल.  या काढ्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत गूळ आणि लिंबू. दोन्ही साहित्य प्रत्येक भारतीय घरात आढळते. लिंबू आणि गूळ दोन्हीचे शरीरासाठी भरपूर फायदे आहेत. तसेच हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  कसे करते काम  गुळामुळे पाचनक्रिया वाढण्यास मदत होते ज्यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. यात प्रोटीन तसेच फायबरही असतात. ही पोषक तत्वे वजन घटवण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात.  लिंबूचा रस शरीराला डिटॉक्स करण्याचे तसेच वजन घटवण्यास मदत करतात. यात पॉलिफेनॉल अंटीऑक्सिडंटही असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे अंटीऑक्सिडंट शरीरातील चरबी वाढवणे रोखतात आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतात.  गूळ गोडासाठी साखरेसाठी एक चांगला पर्याय आहे. कारण यात कॅलरीज कमी असतात. तसेच गुळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. एकत्र गूळ आणि लिंबूचा काढा प्यायल्यास पचन आणि श्वसनतंत्र साफ करण्यास मदत करतात.  कसा बनवायचा काढा  एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा गुळाची पावडर मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि एक चमचा लिंबाचा रस टाका. पुन्हा मिश्रण चांगले ढवळा. वजन घटवण्यासाठी तुम्ही हे पेय दररोज उपाशी पोटी घेऊ शकता. 

Health Tips: लिंबू-गुळाचा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, पाहता पाहता वजन होईल कमी Read More »

Health Tips 2024 : फणस खात नसाल तर आवडीने खायला सुरू कराल, आहेत ‘इतके’ फायदे

Health Tips 2024 : फणसात असे बरेच पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यास फायदेशीर असतात. या मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह सारखे गुणधर्म असतात. या शिवाय ह्यात मुबलक प्रमाणात फायबर देखील आढळतं. आज या लेखात आम्ही  फणसाच्या काही फायद्याबद्द सांगणार आहोत, याची माहिती मिळाल्यावर आपण फणस आवडीने खाऊ लागणार. फणस हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. डोळे आणि त्वचा  फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळतं जे डोळ्यांचा प्रकाश वाढवतो आणि त्वचेला व्यवस्थित ठेवतो. रक्तदाब या मध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम आणि लोह आढळतं जे रक्तदाबासारखे गंभीर त्रासाला दूर करत आणि शरीरातील रक्त विसरणं वाढवतं. तोंडात छाले झाले असल्यास  ज्या लोकांना तोंडात वारंवार छाले होत असल्यास त्यांनी फणसाची कच्ची पानं चावून थुंकली पाहिजेत. या मुळे तोंडाचे छाले बरे होतात. हृदय विकार फणसात अजिबात कॅलरी नसते. हे हृदयच्या रुग्णांसाठी उपयुक्त असतं.  मजबूत हाडे  हाडांसाठी फणस खूप फायदेशीर मानले जाते. या मधील असलेले मॅग्नेशियम हाडांना बळकट करतं.

Health Tips 2024 : फणस खात नसाल तर आवडीने खायला सुरू कराल, आहेत ‘इतके’ फायदे Read More »

Figs Benefits: अनेक आजारांपासून मिळणार सुटका! दररोज खा अंजीर, फायदे जाणून व्हाल थक्क

Figs Benefits: आरोग्यासाठी उत्तम ड्रायफ्रूट म्हणून अंजीरची ओळख आहे. अंजीरमध्ये प्रथिने, आहारातील फायबर, फोलेट, नियासिन, झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह यासह अनेक पोषक घटक असतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. या लेखात आम्ही तुम्हाला अंजीर खाण्याचे फायदे सांगत आहोत. हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे जाणुन घ्या. अंजीर खाण्याचे फायदे पचन सुधारण्यासाठी अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे पचनासाठी चांगले असते. पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी आणि बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी दूर करण्यासाठी अंजीर खाणे चांगले. रक्तदाब नियंत्रणासाठी उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी अंजीरला आहाराचा भाग बनवावा. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत अंजीर खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होऊ शकते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अंजीर खावे. वजन कमी करण्यासाठी अंजीर वजन नियंत्रित करण्यासाठी किंवा वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये फायबर असते ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि अन्नाची लालसा कमी होते. अंजीर खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि भूक कमी होते. अशा स्थितीत वजन कमी करण्यास मदत होते. मजबूत हाडांसाठी अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. हाडांच्या आरोग्यासाठी अंजीराचा आहारात समावेश करावा. ज्यांना अशक्तपणा आणि सांधेदुखीची समस्या आहे त्यांनी अंजीर खावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंजीर खाणे चांगले आहे. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आजारी पडणे. जे लोक वारंवार आजारी पडतात त्यांनी अंजीरचा आहारात समावेश करावा. अंजीरमध्ये असलेले जीवनसत्त्वे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगली असतात.

Figs Benefits: अनेक आजारांपासून मिळणार सुटका! दररोज खा अंजीर, फायदे जाणून व्हाल थक्क Read More »