DNA मराठी

Champions Trophy 2025 News

Chammpions Trophy 2025 : दुबईत वरुण चमकला, भारताने न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

Chammpions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आपल्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. तर न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 5 विकेट्स घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर नेले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने या सामन्यात 249 धावा केल्या, प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ या लक्ष्याच्या जवळही पोहोचू शकला नाही. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र शुभमन गिल आणि रोहित शर्माची सलामी जोडी काही खास कामगिरी करू शकली नाही आणि भारताने लवकरच सुरुवातीच्या विकेट गमावल्या. विराट कोहलीही या सामन्यात फ्लॉप ठरला परंतु अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरने भारतीय डाव सावरला. त्यानंतर हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजी करत 45 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने शानदार कामगिरी करत 5 विकेट्स घेतल्या. 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. हार्दिक पंड्याने लवकरच रचिन रवींद्रला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर वरुण चक्रवर्तीने विल यंगला 22 धावांवर बाद केले. कुलदीप यादवने डॅरिल मिशेलला 17 धावांवर बाद केले, तर रवींद्र जडेजाने टॉम लॅथमलाही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. केन विल्यमसनने एका टोकापासून चांगली फलंदाजी केली आणि 81 धावा केल्या, पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. वरुण चक्रवर्तीने घातक गोलंदाजी केली आणि न्यूझीलंडचा डाव उद्ध्वस्त केला. त्याने 5 विकेट्स घेतल्या आणि किवी संघाला 200 पेक्षा कमी धावांमध्ये गुंडाळले. अक्षर पटेलनेही एक महत्त्वाची विकेट घेतली आणि विल्यमसनला 81 धावांवर बाद करून भारताचा विजय निश्चित केला. या विजयासह भारताने अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे.

Chammpions Trophy 2025 : दुबईत वरुण चमकला, भारताने न्यूझीलंडचा उडवला धुव्वा Read More »

Champions Trophy 2025: भारताची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल झालेल्या न्युझीलँड विरुद्ध बांगलादेश सामन्यात न्युझीलँडने बांगलादेशचा पाच विकेटने पराभव केला आहे. या पराभवानंतर ग्रुप ए मधून न्युझीलँड आणि भारताने सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे तर पाकिस्तान आणि बांगलादेशच्या स्पर्धेतून बाहेर झाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला एकामागून एक दोन मोठे पराभव पत्करावे लागले आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर मोठा पराभव केला तर 23 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानला 29 वर्षांत प्रथमच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. तो ग्रुप स्टेजच्या पुढे जाऊ शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान संघ त्यांचे प्रशिक्षक आकिब जावेद यांना पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच काढून टाकणार आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर संघाला अनुभवी खेळाडूंकडून तीव्र टीका सहन करावी लागली. जावेद मियांदाद म्हणाले, “सिस्टम, निवडकर्त्यांना आणि या सर्वांना दोष देणे निरुपयोगी आहे. प्रश्न असा आहे की निवडलेल्या खेळाडूंमध्ये काही कमतरता आहे का? पीसीबी त्यांची काळजी घेत नाही का? त्यांना पुरेसे पैसे दिले जात नाहीत का? मग मोठ्या सामन्यांमध्ये आणि स्पर्धांमध्ये कामगिरी करण्याची आवड, उत्साह आणि व्यावसायिक वृत्ती कुठे आहे? सत्य हे आहे की सामना सुरू होण्यापूर्वीच आमचे खेळाडू दबावाखाली होते. भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याच्या मनःस्थितीत कोणीही दिसत नव्हते.” बांगलादेशला हरवून न्यूझीलंड उपांत्य फेरीतसोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी विजय आवश्यक होता. रचिन रवींद्रच्या चौथ्या एकदिवसीय शतकामुळे न्यूझीलंडने बांगलादेशच्या कठीण आव्हानावर सहज मात केली. बांगलादेशने दिवसाची सुरुवात चमकदार केली पण मायकेल ब्रेसवेलने खेळाचा मार्ग बदलला. ब्रेसवेलने सलग 10 षटके गोलंदाजी केली आणि त्याच्या स्पेलमध्ये 26 धावा देऊन 4 बळी घेतले. बांगलादेशकडून नाझिमुल शांतोने सर्वाधिक 77 धावा केल्या तर जकार अलीने 45 धावा केल्या. त्यामुळे संघाने 50 षटकांत 9 बाद 236 धावा केल्या. 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खूपच खराब झाली. विल यंग आणि केन विल्यमसन लवकर बाद झाले. यानंतर, रॅचिन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी 57 धावांची भागीदारी करून संघाचा कमबॅक केला.न्यूझीलंडच्या विजयासह बांगलादेशही स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Champions Trophy 2025: भारताची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर Read More »