DNA मराठी

Champion Trophy 2025

NZ vs SA: दक्षिण आफ्रिकेला धक्का देत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, भारताशी होणार सामना

NZ vs SA: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 9 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा फायनल सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड होणार आहे. लाहोर येथे झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य होते, परंतु आफ्रिकेची फलंदाजी अपयशी ठरली आणि त्यांना 50 षटकांत 9 विकेट्स गमावून फक्त 312 धावा करता आल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ असल्याचे सिद्ध झाले. डेव्हिड मिलरने शतक (100) केले असले तरी ते संघाचा पराभव रोखू शकले नाही. आता अंतिम फेरीत न्यूझीलंडचा सामना भारताशी होईल, जो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारतीय संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीत सुरुवात खराब झाली. पाचव्या षटकात त्याने रायन रिकेलटन (17) कडून आपली विकेट गमावली. ही विकेट मायकेल ब्रेसवेलने मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर घेतली. यानंतर, कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. या दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली. बावुमाने 56 धावा केल्या पण मिशेल सँटनरने त्याला बाद केले. मात्र त्यानंतर इतर फलंदाजांना काही खास करता आले नाही.

NZ vs SA: दक्षिण आफ्रिकेला धक्का देत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, भारताशी होणार सामना Read More »

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये पोहचली आहे. 2013, 2017 नंतर सलग तिसऱ्यांदा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोहम्मद शमी आणि विराट कोहली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला 264 धावांवर रोखले तर कोहलीने धावांचा पाठलाग करताना संघाची जबाबदारी घेतली. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, परंतु भारताच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. शमीने 3 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनीही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. पाठलाग करताना विराट कोहलीने श्रेयस अय्यरसह 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनीही भारताच्या विजयाचा पाया रचला. कोहलीने 73 धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर श्रेयसने 45 धावा केल्या. त्यानंतर कोहलीसोबत अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. राहुल (42*) आणि हार्दिक पंड्या (28) यांनी संघाला विजय मिळवून दिला. 14 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला हरवलेभारताने 14 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले. यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात भारताने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते.

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात Read More »