DNA मराठी

BJP manifesto News

IMG 20240417 WA0004

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले असून, संकल्‍प पत्रातून जाहीर करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाव भाजपाच्‍या संकल्‍प पत्राचा आत्‍मा असल्‍याचा विश्‍वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केला. लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या  वतीने प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या संकल्‍प पत्राची माहीती मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांना दिली. भाजपाच्‍या संकल्‍प पत्रासाठी देशातील लोकांच्‍या काय अपेक्षा आहेत, यासाठी सुचना पाठविण्‍याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्‍यांच्‍या आवाहानाला प्रतिसाद देवून, संपुर्ण देशातून १६ लाख सुचना यासाठी प्राप्‍त झाल्‍या. नगर जिल्‍ह्यातूनही १० हजार सुचना संकल्‍प पत्रासाठी पाठविण्‍यात आल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले. नागरीकांच्‍या सुचनांमधून तयार झालेल्‍या या संकल्‍प पत्रात भारताच्‍या अंतरराष्‍ट्रीय संबधापासून ते देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेपर्यंत. समृध्‍द भारत, सुशासन, स्‍वस्‍थ भारत, शिक्षण, क्रिडा अशा सर्वच क्षेत्रांच्‍या विकासाबरोबरच इनोव्‍हेशन, टेक्‍नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्‍य देण्‍यात आल्‍याचे सांगून ना.विखे पाटील म्‍हणाले की, २०४७ सालापर्यंत विकसीत भारत निर्माण करण्‍याचे उदिष्‍ठ पुर्ण करण्‍यासाठी युवाशक्‍ती, नारीशक्‍ती, शेतकरी आणि गरीब यांना सशक्‍त करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला असून, रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करतानाच स्‍टार्टअप योजनेला प्रोत्‍साहन देण्‍याचा प्रयत्‍न  केला जाणार आहे. भारताला प्रक्रीया उद्योगाचे हब बनवून प्रक्रीया उद्योग ग्रामीण अर्थकारणाचे ग्रोथ इंजिन ठरेल असे उदिष्‍ठ या संकल्‍प पत्रातून ठेवण्‍यात आले असून, संस्‍कृती आणि परंपरेची जोपासणा करतनाच देशातील पर्यटन विकासाला गती देण्‍याचा मानस संकल्‍प पत्रातून व्‍यकत करतानाच मागील दहा वर्ष देशातील महिलांना संधीचे होते. आता भविष्‍यातील पाच वर्षे हे महिलांच्‍या भागीदारीचे असतील. याकरीता नारीशक्‍ती वंदना अधिनियम पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्‍या  सरकारची मोठी उपलब्‍धी ठरली असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले .   भाजपाच्‍या संकल्‍प पत्राच्‍या अनुषंगानेच लोकसभा मतदार संघांचा वचननामाही लवकरच प्रकाशित करण्‍यात येणार असून,  जिल्‍ह्यात रोजगार निर्मिती, तिर्थक्षेत्र पर्यटन तसेच जिल्‍ह्यातील प्रलंबित  पाणी योजनांच्‍या सोडवणूकीसाठी प्राधान्‍य देण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्‍हा ध्‍यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, धनंजय जाधव, निखील वारे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित Read More »

IMG 20240414 WA0013

Maharashtra News: भाजापाच्या जाहीरनाम्यात देश आणि समाज हिताचा संकल्प-ना.विखे पाटील

Maharashtra News: लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे संकल्प पत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे.जनतेच्या सूचानामधून तयार झालेला जाहीरनामा देशाच्या व प्रगतीसाठी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी केलेला संकल्पच असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. बुथ सक्षमीकरण अभियानाच्या निमिताने तालुक्यातील मनोली रहीमपूर कोल्हेवाडी आणि जोर्वे येथे आयोजित केलेल्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्राचे स्वागत करून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेल्या संकल्प पत्रामध्ये सामान्य माणसाच्या कल्याणासाठी योजनांची हमी प्रधानमंत्र्यांनी दिली असल्याचे सांगितले. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला.यासाठी योजनारूपी कवच केंद्र सरकारने दिले.सर्व योजना अविरतपणे सुरू आहेत.योजनांचा लाभ लाभार्थीना थेट मिळत असल्याने योजनेतील भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाने आपल्या संकल्प पत्रात सध्या सुरू असलेल्या योजना पुढे घेवून जाण्याचा निर्धार केला आहे.पण सतर वर्षावरील जेष्ठ नागरीकांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपायांच्या उपचाराचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.मोफत धान्य योजना सुरू ठेवण्याची ग्वाही संकल्प पत्रात देण्यात आली असून महीला बचत गटाकरीता सुरू करण्यात आलेल्या लखपती दिदि योजनेचा विस्तार करुन ३कोटी महीलांना लखपती दिदी बनविण्याचा महत्वपूर्ण संकल्प या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाने केला असल्याचे विखे पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली औद्यगिक गुंतवणूक देशात मोठ्या प्रमाणात येत आहे.भारत देश आज गुंतवणुकी करीता सुरक्षित वाटत असून उत्पादन निर्मीती बरोबरच रोजगाराची उपलब्ध करून देण्यावर  केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत केल्याचै विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी झाली आहे.प्रत्येक तालुक्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविला गेल्याने त्याच लाभ सर्वसामान्य जनतेला झाला.महायुती सरकार सतेवर आल्यानंतर नगर जिल्ह्यात तीन औद्यगिक वसाहती करीता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यात आल्या.याठिकाणी उद्योग येण्यास प्रारंभ होणार असून जिल्ह्यातील दहा ते पंधरा हजार युवकांना रोजगाराची संधी मिळेल.एक रुपयात पीक विमा योजना आणि दूध उत्पादकांना पाच रूपये अनुदान देण्याचे आश्वासन महायुती सरकारने प्रत्यक्ष कृती करून पूर्ण केले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनाही प्रचारात भरघोस पाठींबा मिळत असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामामुळे महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील आणि खा.सदाशिव लोखंडे यांचा  विजय होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Maharashtra News: भाजापाच्या जाहीरनाम्यात देश आणि समाज हिताचा संकल्प-ना.विखे पाटील Read More »