DNA मराठी

Bajrang Sonawane

बीड मधील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाची घटना काळीमा फासणारी…, आरोपींवर कठोर कारवाई करा

Bajrang Sonawane : बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी पोलीस अधीक्षकांना देखील बोललो आहे. याच प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर आरोप केले आहेत परंतु आरोप करणे सोपे आहे. ते सिद्ध होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात असलेल्या आरोपींचा संदीप क्षीरसागर यांची संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यानंतर आता बीडमधील राजकारण तापले असून आमदार मुंडे यांनी केलेले आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी फेटाळून लावत सरकार तुमचे आहे. तुम्ही चौकशी लावा आरोप सिद्ध झाले तर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत असे देखील म्हटले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून या प्रकरणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर धनंजय मुंडे राजकारणातून काही दिवसांसाठी गायब झाले होते.

बीड मधील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाची घटना काळीमा फासणारी…, आरोपींवर कठोर कारवाई करा Read More »

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप

Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर आता या प्रकरणात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव करण्यात येत आहे असा आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडने केला आहे. माध्यमांशी बोलताना माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच आम्हाला मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका निवडणुकीत माझ्या नवऱ्याने तुमचे काम केले आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देता आहे. असं देखील त्या म्हणाल्या. माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाल्या की मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत आहेत. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की हे थांबवा. घटना घडली त्यादिवशी माझे पती परळीत किंवा जिल्ह्यात नव्हते. वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाले म्हणून डोळ्यात खुपू लागले. बजरंग सोनवणे यांनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप Read More »