DNA मराठी

Anna Hazare news

Ahmednagar News : मंत्री विखे पाटील यांचा पारनेरमध्ये भेटीचा धडाका, समाजसेवक आण्णा हजारे यांची घेतली भेट

Ahmednagar News: गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यात भेटीगाठीचा धडाका लावला.जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्याशी संवाद साधत कार्यकर्त्यांना सूचना केल्या. दोन दिवसांपुर्वी महायुतीचे उमेदवार खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांना आलेली धमकी आणि या घटनेचे जिल्ह्यात उमटलेले पडसाद पाहाता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेला पारनेर दौरा लक्षवेधी ठरला आहे. या दौर्यात जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची राळेगण येथे भेट घेवून मंत्री विखे पाटील यांनी पाडवा आणि नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या दोघा मध्ये सुमारे अर्धातास बंददारा आड चर्चा झाली.मात्र या चर्चाचा तपशिल समजू शकला नाही. महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याच्या आलेल्या धमक्याचा संवाद समाज माध्यमामध्ये प्रसारीत झाल्या नंतर त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले.प्रसारीत झालेला संवाद आणि त्यातील व्यक्ति विरोधी उमेदवारांचे समर्थक असल्याची चर्चाही सुरू झाली.याविरोधात महायुतीच्या वतीने पुरावे सादर करून संबंधित व्यक्ति विरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. या घटनेनंतर मंत्री विखे पाटील यांचा  पारनेरचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.या दौर्यात पदाधिकारी  व  कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून प्रचाराचा कानमंत्र सुध्दा दिला आहे.आगामी काळात तालुक्यातील प्रचाराचे नियोजन तसेच मतदारपर्यत पोहोचण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने त्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. विशेष म्हणजे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांची निवासस्थानी जावून मंत्री विखे पाटील यांनीभेट घेतली.एक तासाच्या भेटीला विशेष महत्व आले आहे.

Ahmednagar News : मंत्री विखे पाटील यांचा पारनेरमध्ये भेटीचा धडाका, समाजसेवक आण्णा हजारे यांची घेतली भेट Read More »

Anna Hazare : आता मुख्यमंत्र्यांची पण चौकशी होणार!! जाणून घ्या नवीन कायद्याबद्दल सर्वकाही……

Anna Hazare: भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा समावेश करत विधान परिषदेने महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाला अखेर वर्षभरानंतर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतेमंडळींची चौकशी करणे शक्य होणार असून मुख्यमंत्री, मंत्री व आमदारही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी केले आहे. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच लोकायुक्त हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. तब्बल वर्षभरानंतर हे विधायक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देखील आता या कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाही लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लढा दिला. या दरम्यानच्या काळात अनेक मोठी आंदोलने देखील अण्णांनी केली. विधानसभेत मंजूर झालेला हा कायदा आता विधानपरिषदेत देखील मंजूर झाला.  तसेच पुढे बोलताना अण्णा म्हणाले, आम्ही केलेल्या मागणीनुसार लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार झाला होता. हा मसुदा विधानसभेत मंजूर करण्यात आला होता. विधान परिषदेत हे विधेयक आल्यानंतर यात सदस्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची चौकशी या माध्यमातून करता येणार आहे. मुख्यमंत्री देखील आता या कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाही. या कायद्याच्या आधारे आता मुख्यमंत्र्यांवर देखील कारवाई करणे शक्य होणार आहे असे यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणाले.

Anna Hazare : आता मुख्यमंत्र्यांची पण चौकशी होणार!! जाणून घ्या नवीन कायद्याबद्दल सर्वकाही…… Read More »