Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी
Manoj jarange Patil : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अजय बारस्कर यांनी अपशब्दचा वापर केल्याने तसेच जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवत असल्याने अजय बारस्करवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अजय बारस्करने ए. बी. पी माझा या प्रसार माध्यमाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अर्वाच्य भाषा वापरली तसेच ज्या घटनेशी मनोज जरांगे पाटील साहेबांचा कुठलाही संबंध नसताना खोटा संबंध जोडुन बदनामी व अपमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सकल मराठा बांधवांच्या भावना दुःखावत आहे. त्यामुळे अजय बारस्कर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाही करावी. त्याला योग्य ती समज अथवा कार्यवाही करून आम्हाला न्याय निवुन देणेस नम्र विनंती. यावेळी गोरख दळवी, राम सातपुते, गणेका भोसले, सखाराम गुंजाळसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
