DNA मराठी

Airtel Recharge

Mobile Recharge: अरे वा…आता करता येणार फक्त SMS अन् कॉलिंगसाठी स्वस्त रिचार्ज

Mobile Recharge: टेलिकॉम कंपन्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज सुविधा प्रदान करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. ट्रायने सांगितले की, या ग्राहकांना अनावश्यक सेवांसाठीही पैसे मोजावे लागतात. अशा लोकांसाठी अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र रिचार्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना ट्रायने दूरसंचार कंपन्यांना केली आहे. TRAI ने 2012 च्या दूरसंचार ग्राहक संरक्षण नियमांमध्ये सुधारणा करून हा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की कमीत कमी एक स्पेशल टेरिफ व्हाउचर फक्त व्हॉइस आणि एसएमएस सेवांसाठी जारी केले जावे. देशातील 15 कोटी मोबाईल ग्राहक अजूनही 2G कनेक्शन वापरतात. हे लक्षात घेऊन ही नवीन दुरुस्ती करण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्यांना विद्यमान रिचार्ज व्हाउचरसह जास्तीत जास्त 365 दिवसांची वैधता प्रदान करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. वृद्ध, ग्रामीण भागातील लोक आणि इंटरनेटचा जास्त वापर न करणाऱ्या दोन सिम वापरणाऱ्यांसाठी ही सूचना फायदेशीर ठरणार आहे. स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि कॉम्बो व्हाउचरची वैधता देखील 90 दिवसांवरून 365 दिवसांपर्यंत वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय ट्रायने टॉप-अपसाठी 10 रुपयांच्या पटीत असलेली अटही काढून टाकली आहे.

Mobile Recharge: अरे वा…आता करता येणार फक्त SMS अन् कॉलिंगसाठी स्वस्त रिचार्ज Read More »

Jio – Airtel ची धाकधूक वाढणार, BSNL चा नवा धमाका, 300 दिवसांसाठी स्वस्त प्लॅन लॉन्च

BSNL Recharge: जर तुम्ही देखील स्वस्त रिचार्ज प्लान शोधत असाल तर तुमच्यासाठी बीएसएनएलने जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. या नवीन रिचार्ज प्लॅन अंतर्गत तुम्हाला तब्बल 300 दिवसांच्या सिम वैधतेची ऑफर मिळणार आहे.   या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे यात डेटा, फ्री कॉल्स आणि एसएमएसचाही समावेश आहे. BSNL ने 797 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे जो 300 दिवसांची सिम वैधता देतो. म्हणजेच ग्राहकांना दिवसाला केवळ तीन रुपये खर्च करावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी मोफत नॅशनल रोमिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 SMS मिळतात. 60 दिवसांनंतर, इनकमिंग कॉल सुरू राहतील परंतु डेटा, कॉल आणि एसएमएस मिळविण्यासाठी टॉप-अप करावे लागेल. BSNL चा दुय्यम सिम वापरणाऱ्यांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे. पहिल्या दोन महिन्यांसाठी मोफत डेटा, कॉल आणि एसएमएसचा लाभ घेऊन ते याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात. मोफत सेवा 60 दिवसांनंतर बंद होत असली तरी सिम 240 दिवस ॲक्टिव्ह राहण्याची हमी बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांनी किमती वाढवल्यानंतर बीएसएनएल आकर्षक प्लॅनसह ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. कमी किमतीत उत्तम सेवा देण्यावर बीएसएनएलचा भर आहे. या रणनीती अंतर्गत, BSNL आपले 4G नेटवर्क देखील वाढवत आहे. अनेक दूरसंचार मंडळांमध्ये 4G सेवा सुरू झाल्या आहेत आणि BSNL ने दूरसंचार मंत्रालयाच्या सहकार्याने 5G चाचण्याही सुरू केल्या आहेत.

Jio – Airtel ची धाकधूक वाढणार, BSNL चा नवा धमाका, 300 दिवसांसाठी स्वस्त प्लॅन लॉन्च Read More »