Ahmednagar Rain: जामखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्याला आले नदीचे स्वरूप
Ahmednagar Rain: राज्यातील बहुतेक भागासह अहमदनगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. यातच जामखेड मोहरी परीसरात रात्री आठच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ केली. जामखेड शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर तसेच जामखेड नगर रस्त्यावर आणि नाल्यात पूरसदृश पाण्यामुळे वाहतूक चार तास खोळंबली होती त्यामुळे परिसराचा संपर्क तुटला. तसेच परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते तर मोहरी परिसरात जोरदार पावसामुळे नदी ओढ्याकाठची शेती वाहुन गेली. तर अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. आता या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मोहरी तलाव एकाच पावसाने ओव्हर फ्लो झाला आहे.
Ahmednagar Rain: जामखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्याला आले नदीचे स्वरूप Read More »
