DNA मराठी

Ahmednagar crime

Ahilyanagar News : अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तीन वेठबिगारांची सुटका, दोन वर्षांपासून गोठ्यात कैद

Ahilyanagar News : मानवी हक्कांचा भंग करणारी धक्कादायक घटना अहिल्यानगरात उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुरुडगाव परिसरात छापा टाकून तब्बल दोन वर्षांपासून कैदेत ठेवून गोठ्यात जबरदस्तीने काम करण्यास लावण्यात आलेल्या तीन वेठबिगारांची सुटका केली. या प्रकरणी जाकिश उर्फ बबड्या काळे (वय 35, रा. जयपूर) याला अटक करण्यात आली असून, आणखी एका संशयिताविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैद आणि बळजबरीचे वास्तव तपासानुसार, अटक आरोपीने एक कामगार नागपूरहून तर दोन कामगार उत्तर प्रदेशहून आणले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना आपल्या घराशेजारील गायीच्या गोठ्यात कैद करून ठेवले होते. बाहेर जाण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली होती. कामगारांवर सतत लक्ष ठेवून, मारहाण करत व धमकावत त्यांच्याकडून गोठ्यातील कामे करवून घेतली जात होती. या काळात पीडितांना मोबदला न देता केवळ जेवणापुरतेच सोय करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. खात्रीशीर माहितीवर छापा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांना आरोपीकडे तीन जणांना बेकायदेशीररीत्या कैद करून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. पथकाने बुरुडगाव परिसरातील आरोपीच्या घरावर छापा टाकून तिघांना सुरक्षितपणे मुक्त केले. पीडितांची ओळख सुटविण्यात आलेल्या तीन कामगारांपैकी एक जण नागपूरचा आहे, तर उर्वरित दोघे उत्तर प्रदेशातील आहेत. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, आरोपीने त्यांना वेठबिगार म्हणून आणले होते आणि दोन वर्षांपासून कोणत्याही मोबदल्याशिवाय, जबरदस्तीने काम करवून घेत असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास सुरू या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भादंवि कलम 370 (मानव व्यापार), 342 (बेकायदेशीर कैद), 323 (मारहाण), 506 (धमकी) आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा सहकारी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पीडितांना पोलिस संरक्षणाखाली सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील वेठबिगार प्रथेला मोठा धक्का बसला असून, अशा प्रकारचे प्रकरणे उघड करण्यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तीन वेठबिगारांची सुटका, दोन वर्षांपासून गोठ्यात कैद Read More »

Ahmednagar Crime : अनैतिक संबंध अन् शेवगावात पत्नीने केली पतीची हत्या

Ahmednagar Crime: शेवगावात अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा त्याचे पत्नीने व तिच्या प्रियकराने मिळुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीसांनी या प्रकरणात कारवाई करत 12 तासाचे आत आरोपीला अटक केली आहे. माहितीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव (32 वर्ष) याची विजयपुर गावामधील अनिल ज्ञानदेव जगदाळे व त्याची प्रियसीने हत्या केली होती.  आरोपी अनिल ज्ञानदेव जगदाळे याने डोक्यात, हातावर, छातीवर लोखंडी गजाने मारहान करुन ज्ञानेश्वरची हत्या केली. या प्रकरणात मयत ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांचे वडिल पांडुरंग बाबासाहेब जाधव यांनी वरिल दोघांविरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सं.कलम-103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.   या प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक समाधान नांगरे  वेगवेगळी दोन पोलीस पथके बिडकीन, पैठण व छत्रपती संभाजीनगर भागात रवाना केली होती.

Ahmednagar Crime : अनैतिक संबंध अन् शेवगावात पत्नीने केली पतीची हत्या Read More »

Ahmednagar Crime : अभिजीत सांबरेची हत्याच! 14 महिन्यानंतर धक्कादायक खुलासा

Ahmednagar Crime : 14 महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अभिजीत राजेंद्र सांबरे (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) यांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र त्यांच्या मृत्यु संशयास्पद झाला असल्याचा दावा नातेवाईकांकडून करण्यात येत होता.   सदर संशयास्प्द मुत्यू त्याचे सोबत असणारा मित्र प्रमोद जालींदर रणमाळे याने घडवुन आणला असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येत होता.   या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हेशाखा, युनिट क. 2 कडिल पोहवा/मनोहर शिंदे यांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने  आरोपी प्रमोद जालींदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, यांनी शिताफिने ताब्यात घेतले.  आरोपीची वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे यांनी तपास कौशल्य, अ.मू.चे पेपर अवलोकन, तांत्रीक विश्लेषण वापरून विचारपुस केली असता आर्थिक व्यवहारातून हत्या केल्याची कबुली दिली.  मयत अभिजीत सांबरे हा आरोपीचा मित्र होता. त्यांचे यापुर्वीपासुन पैश्यांचे व्यवहार होते व त्यातुन त्यांचा वाद विकोपास गेला होता. त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे याने मयत इसम अभिजीत सांबरे यास मारण्याबाबत डाव आखलेला होता.  27 जुन 2023 रोजी आर्थीक व्यवहाराकरीता यातील मयत हा येवला जि, नाशिक येथे जाणार होता. त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते. संशयित प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजीत सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेवुन रात्री 9.00 वाचे सुमारास त्यास दारूमधुन ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरीक्त मात्रेमध्ये गोळया मिसळुन त्यास दारू पाजली. त्यातुन मयत अभिजीत सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असतांना त्यास त्याचे बुलेट गाडीवर मागे बसुन येवला येथुन संभाजीनगर कडे जाणा-या रस्त्याने वैजापुर गावाजवळुन कोपरगाव रस्त्याने घेवुन गेला.  मयत इसम अभिजीत सांबरे याची शुध्द हरपल्याचा अंदाज घेवुन गाडी थांबवुन त्यास कोपरगाव रस्त्याचे कडेला फेकुन देवुन पोबारा केला होता.  या प्रकरणात कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे भादंविक 302 प्रमाणे दाखल झाला असुन त्यास पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे.

Ahmednagar Crime : अभिजीत सांबरेची हत्याच! 14 महिन्यानंतर धक्कादायक खुलासा Read More »