DNA मराठी

Social media

Marriage Viral Advertisements: 28 एकर फार्महाऊस अन् एकुलता एक मुलगा लग्नासाठी पाहिजे, सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल

Marriage Viral Advertisements : आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडियावर लग्नाच्या जाहिरातींचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातच सोशल मीडियावर एका लग्नाची जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये 30 वर्षीय महिला आदर्श पती शोधत आहे. या महिलेला लग्नासाठी मुलगा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असावा आणि त्याच्याकडे किमान 28 एकरचे फार्महाऊस असावे, अशी मागणी 30 वर्षीय महिलेने केली आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका 30 वर्षीय महिलेची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या अजब जाहिरातीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काय आहे महिलेची मागणी?30 वर्षीय महिला लग्नासाठी आदर्श पती शोधत आहे. ज्यांचे वय 25 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. आणि तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असावा तसेच त्याच्याकडे चांगला आणि मजबूत व्यवसाय असणे आवश्यक आहे. मुलाकडे किमान 28 एकरचा बंगला किंवा फार्महाऊस असावा. मुलाला स्वयंपाक कसा करावा हे माहित असले पाहिजे. या पोस्टला 3,000 हून अधिक वेळा लाईक केले गेले आहे आणि 800 हून अधिक वेळा शेअर केले गेले आहे.

Marriage Viral Advertisements: 28 एकर फार्महाऊस अन् एकुलता एक मुलगा लग्नासाठी पाहिजे, सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल Read More »

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले!

Ahmednagar News: आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असतात.  काहीजणांना सोशल मीडियावर प्रेम देखील होतो मात्र त्यानंतर अनेकांची फसवणूक झाल्याची अनेक बातम्या आपण वाचले आहेत.  अहमदनगर शहरात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली आहे. अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन मुली सोशल मिडीयाच्या इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी ओळख करून घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली मात्र उपयोग झाला नाही.त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनातून कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले आणि काही दिवस पाहुण्यांकडे अहमदनगरमध्ये आली आणि निघून गेलेल्या दुसऱ्या मुलीला मराठवाड्यातून आणले.  सोशल मिडीयावर झालेले प्रेम,मैत्री हे मृगजळासारखे असते. दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलांकडून जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई वडील नातेवाईकांचा जराही विचार न करता कल्पना विश्वाच्या जगात हरवून जातात. मात्र यातून कुटुंबाला होणारा त्रास, बदनामी अटळ असते. जेंव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याचे समजले. तपास लावल्यानंतर मुलींच्या परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान विश्वास गाजरे,रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला. ‘याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याची मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी. पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याचे भावनिक आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.’ …मग आयुष्याचा जोडीदार निवडताना का काळजी घेत नाही?  ‘सर्व शाळा-महाविद्यालयात मार्गदर्शन करताना चंद्रशेखर यादव एक आवर्जून उदाहरण सांगतात की,’आपण एक टिकलीचे पाकीट घ्यायचे असेल तर दहा ते बारा पाकीट चाळून पाहतो, चप्पल ड्रेस किंवा काहीही घ्यायचं म्हटलं तरी चार ते पाच दुकानात जाऊन पाहतो मग, आपण आयुष्याचा जोडीदार निवडताना किती काळजी घ्यायला पाहिजे? त्यामुळे मुलींनी अधिकची काळजी घ्यायला हवी’

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले! Read More »