Sillod News: शिवना येथे जुगार खेळणाऱ्या 07 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल
प्रतिनिधि शेख नदीम Sillod News : सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सोमवारी अजिंठा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत झन्ना मन्ना खेळणाऱ्या 7 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3330 रुपयाचा नगद व जुगार खेळणाच्या साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवना परिसरातील देशी दारूच्या दुकाना समोरील पत्र्याच्या शेडात झन्ना मन्ना जुगार सुरू असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अजिंठा पोलिसांनी सोमवारी सकाळच्या सुमारास धाडी टाकली असता दादाराव काळे,रमेश काळे (दोघे रा.खुपटा),गजानन वाघ,शेख रसूल,विजय बावस्कर,रामराव पवार (सर्व रा.शिवना),हिरामण बावस्कर (रा.सोयगाव ) यांना रंगेहाथ पकडले . आरोपींविरोधात अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3330 रुपये नगद व जुगाराचा साहित्य जप्त करण्यात आला आहे .
Sillod News: शिवना येथे जुगार खेळणाऱ्या 07 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल Read More »