Gangster Sharad Mohol : गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळ ठार, जाणून घ्या कोण होता पुण्याचा गुन्हेगार?
Gangster Sharad Mohol: पुणे शहरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून शुक्रवारी दुपारी हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी काही अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील सुतारदरा परिसरात घडली. या हल्ल्यात शरद मोहोळ गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरदिवसा झालेल्या गोळीबाराने शहरात खळबळ उडाली आहे. […]
