Railway Scam: धक्कादायक! रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 23 जणांची फसवणूक; अधिकाऱ्याला अटक

Railway Scam: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचं आमिष दाखवून 23 हून जास्त  तरुणांची फसवणूक करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे.   आरोपी अधिकाऱ्याने 23 हून अधिक लोकांना रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रेल्वेत नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी अधिकारी मध्य रेल्वेमध्ये मुख्य डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (CDMS) आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने राजेश रमेश नायक याला ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, नायकने दोन भावांना रेल्वेत नोकरी लावण्याच्या नावाखाली 10 लाख रुपयांहून अधिक रक्कम घेतल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी सीबीआयकडे जाऊन रेल्वे अधिकारी राजेश नायक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला. झडतीदरम्यान सीबीआयने विविध कागदपत्रे जप्त केली. 23 हून अधिक लोक कथितपणे फसवणुकीचे बळी ठरल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे.

Railway Scam: धक्कादायक! रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 23 जणांची फसवणूक; अधिकाऱ्याला अटक Read More »