Ahmednagar Police: हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 14 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar Police: अहमदनगर शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते.  या आदेशावरून आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेला 05 जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सर्जेपुरा भागात इंगळे आर्केडचे तळघरामध्ये कृष्णा अशोक इंगळे हा सार्वजनीकरित्या मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असा तंबाखुजन्य पदार्थ स्वत:कडे बाळगुन हुक्का पार्लर चालवित आहेत.  या माहितीवरून पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन छापा टाकुन हुक्का पार्लर चालविणारे व हुक्का पिणारे इसम 1) कृष्णा अशोक इंगळे (वय – 31 वर्षे), 2) प्रशांत गजानन सोनवणे (वय 34 वर्षे), 3) परेश सुर्यकांत डहाळे (वय 34)   यांना ताब्यात घेतले.  ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे कब्जामध्ये शासनाने बंदी घातलेले हुक्क्यासाठी आवश्यक तंबाखुजन्य पदार्थ, विविध कंपनीचे फ्लेवर व साधने असा 14,850 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.  आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात सिगारेट व इतर तंबाखु जन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतीबंध आणि व्यापार वाणीज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिनियम) अधि.2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) /21 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagar Police: हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 14 हजारांचा मुद्देमाल जप्त Read More »