Gondia News : बिग ब्रेकिंग! दगडाने ठेचून युवकाची हत्या….
Gondia News:- गोंदिया शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गोंदिया शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुर्री येथिल शासकीय भारतीय खाद्य महामंडळ गोदामा जवळ एका अज्ञात 38 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटणा मंगळवार – बुधवार च्या मध्यरात्री दरम्यान समोर आली आहे. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी दोन संशयिताना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र हत्या कोणत्या वादावरून करण्यात आली आहे. हे अद्याप कळू शकले नसुन हत्या झालेल्या युवकाची ओळखही अद्यापपर्यंत पटू शकली नाही. या घटनेचा तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खडबड उडाली आहे.
Gondia News : बिग ब्रेकिंग! दगडाने ठेचून युवकाची हत्या…. Read More »
