Maharashtra Crime News : धक्कादायक! चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या, आरोपीला अटक
Maharashtra Crime News: चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश विठ्ठल पवार यांनी 24 ऑक्टोबर रोजी पत्नी चिचोंडी पाटील येथे अंगणवाडी सेविका म्हणुन काम करत असून मात्र आतापर्यंत घरी आली नसल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणात तपास करताना पोलिसांनी अंगणवाडीचे कुलूप तोडून पाहिले असता अंगणवाडीमध्ये मयत यांच्या वस्तु व रक्ताचे डाग दिसुन आले. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 140 (1) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले. पथकाने गुन्हयाचे तपासात तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी सुभाष बंडू बर्डे, (वय 25) रा.कुक्कडवेढे, रा.चिचोंडी पाटील यास निष्पन्न करून ताब्यात घेतले. मयत महिलेने आरोपीस त्याचे मुलीचे पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये बोलविले असता, मयत महिलेस एकटे पाहुन आरोपीने तिचेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता मयताने त्यास विरोध केल्याने, आरोपीने तिचे डोके भिंतीवर आदळले त्यात महिला बेशुध्द पडून जागीच मयत झाली. त्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी शेजारील नदीचे पात्रात टाकुन दिलेबाबत माहिती सांगितली. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.
