OmRaje Nimbalakar: उद्धव ठाकरेंना जनता पुन्हा त्या खुर्चीवर बसवेल, ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केला विश्वास

OmRaje Nimbalakar: येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जनता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता.  खुर्चीला चिटकून न राहता त्यांनी लगेच राजीनामा देऊन बाजूला झाले. वर्षा बंगला ते मातोश्री मातोश्रीवर जात असताना ज्या माणसांचा राजकारणाची काही संबंध नाही त्या नागरिकांच्या डोळ्यात पाणी होतं तीच जनता त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करेल उद्धव ठाकरे हे मुरब्बी राजकारणी नाहीत सर्वसामान्य आणि कौटुंबिक माणूस आहे त्यांना खुर्चीचा कुठलाही मोह नाही कोरोनाच्या काळात त्यांनी कुटुंब म्हणून महाराष्ट्राला सांभाळले.  येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता पुन्हा एकदा त्यांना त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.  ते कर्जत जामखेड येथे रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.

OmRaje Nimbalakar: उद्धव ठाकरेंना जनता पुन्हा त्या खुर्चीवर बसवेल, ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केला विश्वास Read More »